*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
तुळजापूर : तुळजापूर शहरातील व ग्रामीण भागातील लाडक्या बहिणी मीनाताई सोमाणी यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांच्या संघटनात्मक नेतृत्वात हा ऐतिहासिक प्रवेश सोहळा पार पडला.
या कार्यक्रमात माधुरी पाटील,सारीका तेलंग,रेणुका शिंदे,लता हरवाळकर,अरुणा कावरे,राधा घोगरे यांच्यासह अनेक महिलांनी शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश केला. महिलांच्या या सक्रिय सहभागामुळे तुळजापूरातील राजकीय समीकरणं बदलू लागले आहेत.
पक्षप्रवेश कार्यक्रमात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थित महिलांना संबोधित करत, “शिवसेना ही जनतेच्या हक्कासाठी लढणारी आणि महिलांचा सन्मान जपणारी पक्षसंस्था आहे.सर्व बहिणींनी पक्षात प्रवेश करून आमचा हात बळकट केला आहे, याबद्दल मी त्यांच्या आभारी आहे. त्यांच्या पाठीशी मी सदैव राहीन,” असे भावनिक उद्गार काढले.
तालुक्यात शिवसेनेच्या शाखा एकापाठोपाठ सुरू होत असून, युवक व महिलांचा पक्षात ओघ सुरू आहे. यामुळे तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढत असून, तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे तालुक्यात शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस भक्कम होत असून आगामी काळात तुळजापूरात मोठा राजकीय बदल घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा