*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची सुबुद्धी सरकारला यावी या मागणीसाठी 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वााभिमानी माजी मंत्री सतेज पाटील, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, खासदार प्रणितीताई शिंदे, यांच्यासह इतर नेतेमंडळीनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीजवळ विठ्ठल मुर्तीला साकडे घातले.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शक्तिपीठ महामार्गातील बाधित 12 जिल्ह्यातील हजारो शेतकरी सामिल झाले.
शुक्रवार, 4 जुलै 2025 स्थळ- पंढरपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा