Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ५ जुलै, २०२५

*खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट मीटर बसविण्याच्या विरोधात सोलापूर येथे MSEB कार्यालयासमोर निदर्शने व आंदोलन*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

*स्मार्ट मीटरच्या माध्यमातून मोदी सरकार जनतेची लुट करत आहे, ही लुट थांबवा, नागरिकांनी स्मार्ट मीटर बसवण्यास ठाम विरोध करावा असे आवाहनखासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर येथे*

महावितरण कंपनीकडून सोलापूर शहर जिल्ह्यात मोदी सरकार पुरस्कृत, अदानीच्या फायद्यासाठी स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू असून या स्मार्ट मीटर मुळे ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून केंद्र सरकार व अदानी यांच्या विरोधात सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या उपस्थितीत MSEB ऑफिस जुनी मिल कंपाऊंड समोर निदर्शने करून निषेध करण्यात आला.


यावेळी जनतेचा एकच नारा - स्मार्ट मीटर रद्द करा, स्मार्ट मीटर हटवा - जनतेला वाचवा, जनतेच्या खिशावर वार - स्मार्ट मीटर नको सरकार, जनता कंगाल - अदानी मालामाल, जनतेच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो अश्या जोरजोरात घोषणाबाजीने जुनी मिल कंपाऊंड परिसर दणाणून गेला.


यावेळी खासदार प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांनी संपत गावडे कार्यकारी अभियंता सोलापूर मंडळ यांना निवेदन दिले.


यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोलापूर शहर जिल्ह्यात नागरिक घरात नसतानाही जबरदस्तीने अदानी स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. यास जनतेमधून तीव्र विरोध होत आहे. मोदी आणि महायुती सरकार स्मार्ट मीटर जनतेवर थोपवत आहे. त्यामुळे नागरिकांना पूर्वीच्या मीटरच्या दुप्पट, तिप्पट वीज बिल येत आहे. किरकोळ वापरकर्त्यांना सुद्धा भरमसाठ वीजबिल येत आहे. आणि जबरदस्तीने वसूल केलेले वीज बिलाचे पैसे अदानीच्या आणि सरकारच्या खात्यात जात आहेत. म्हणून या स्मार्ट मीटरला जनतेचा आणि काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. घरी कोणी नसताना स्मार्ट मीटर बसवितात त्यामुळे सतर्क रहा. स्मार्ट मीटर बसवायला आले तर नागरिकांनी विरोध करावा त्यांना परत पाठवा. जे स्मार्ट मीटरला विरोध करतात त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा करतो म्हणून गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात येत आहे या हुकूमशाही प्रवृत्तीला आमचा विरोध आहे. या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून मोदी सरकार जनतेची लूट करून अदानीचा खिसा भरत आहे. त्यामुळे सरकारने स्मार्ट मीटर बसविणे ताबडतोब बंद करावे. आज त्यासाठी आंदोलन करण्यात आले निवेदन दिले. तरीही स्मार्ट मीटर लावत असेल तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.



यावेळी शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, प्रदेश सचिव विनोद भोसले, शकील मौलवी, राहुल वर्धा, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी नगरसेवक मधूकर आठवले, NK क्षीरसागर, हारून शेख, म. प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, ब्लॉक अध्यक्ष लक्ष्मीकांत साका, अब्दुल खलीक मुल्ला, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, VJNT अध्यक्ष युवराज जाधव, प्रवक्ते सेल अध्यक्ष नागनाथ कदम, उद्योग सेलचे पशुपती माशाळ, युवक मध्य अध्यक्ष वाहिद बिजापूरे, अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष नजीब शेख, मागासवर्गीय सेल अध्यक्ष उमेश सुरते, विद्यार्थी संघटना अध्यक्ष नागेश म्याकल, शिक्षक सेल अध्यक्ष सुबोध सुतकर अँड केशव इंगळे, अंबादास गुत्तीकोंडा, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, कोमोरो सय्यद, शफी हुंडेकरी, हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, शोहेब महागामी, परशुराम सतारेवाले, गिरिधर थोरात, पृथ्वीराज नरोटे, भीमराव शिंदे, विवेक कन्ना, शुभांगी लिंगराज, ज्योती गायकवाड, रेखा बिनेकर, नागेश म्हेत्रे, सागर उबाळे, शिवशंकर अंजनालकर, अनिल जाधव, रफिक चकोले संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, वशिष्ठ सोनकांबळे, दिनेश म्हेत्रे श्रीशैल रणधीरे, राजेश झंपले, सायमन गट्टू, विवेक इंगळे, रजाक कादरी, नूर अहमद नालवार, मेघश्याम गौडा, गौतम मसलखांब, बापूसाहेब घुले, मोहसीन फुलारी, शिवाजी साळुंखे, लखन गायकवाड, शशिकांत शिंदे, शाहू सलगर, तौसिफ शेख, चंद्रकांत टिक्के, दिगंबर मेटकरी, अप्पा सलगर, करीमुनिसा बागवान, निशा मरोड, शोभा बोबे, सुनील डोळसे, व्यंकटेश बोमेन, सलीम शेख, मार्ता रावडे, रुकैय्या बिराजदार, अनिता भालेराव, अनवर शेख बाबा शेख, गुरु वरगंटी चंद्रकांत टिक्के, विजय बालनकर, सरफराज नदाफ, गंगाधर शिंदे, आनंद समारंभ, मधुकर गाजुल, बसू कोळी, कुणाल गायकवाड, बाबा शेख, अभिलाष अच्युकटला, दीपक मठ यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा