*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून दरवर्षी संत मुक्ताईंचा आषाढीवारी पालखी सोहळा साजरा होतो. राज्यभरातून संत एकनाथ महाराज, संत सोपान काका, संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरला येतात. त्याचप्रमाणे मुक्ताईनगर येथून हजारो वारकरी, टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा घोष आणि भक्तीमय वातावरणात पंढरीच्या वाटेवर निघालेल्या संत मुक्ताई पालखीचे मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे पालखीच्या मुक्कामी ठिकाणी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संत मुक्ताई पालखीचे दर्शन घेतले.
यावेळी मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रभैय्यासाहेब पाटील, पालखी सोहळा प्रमुख ह. भ. प. रवींद्र महाराज हरणे, मुक्ताई संस्थान विश्वस्त सम्राट पंजाबराव पाटील, ह भ प विशाल महाराज खोले, अक्षय महाराज भोसले, सुलेमान तांबोळी, राजेश पवार, मनोज यलगुलवार, विजय सावंत, बाबा गाडे, भारत विभुते, जीवराज गुंड, आष्टीचे प्रथम नागरिक डॉक्टर अमित भैया राजेभाऊ पाटील, संदीप पाटील यांच्यासह इतर मान्यवर, वारकरी मंडळी व गावकरी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा