Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ६ जुलै, २०२५

ज्ञानोबा...तुकाराम...ज्ञानोबा... तुकाराम जयघोषाने माळीनगर दुमदुमले...!

 


*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्युज मराठी

तुकोबारायांच्या पालखी सोहळयातील पहिले उभे रिंगण उत्साहात संपन्न



जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील लाखो वारकरी क्षेत्र देहू येथून हरिनाम गात मजल दर मजल करत क्षेत्र पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला जाताना पालखी सोहळ्यातील पहिले मानाचे उभे रिंगण माळीनगर (ता. माळशिरस) येथे भक्तीरसात नाहून जयघोष करीत वाटचाल करतात.हीच प्रथा यंदाही पालखी सोहळ्याने जपत मानाचे दोन अश्व उभे रिंगणात सोडून या अश्वांच्या परिक्रमेने वारकऱ्यांनी अनेक सांप्रदायिक खेळ खेळत पहिले उभे रिंगण आज बुधवारी सकाळी ९ वा.उत्साहात उत्साही,आनंदमय वातावरणात पार पडले.

         पांडुरंगा भेटायची आस, आतुरले नयन, विठ्ठल वाणी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकाराम ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करीत संत तुकाराममहाराज पालखी सोहळा अकलूज येथील मुक्काम आटोपून आज बुधवार दि.२ जून रोजी सकाळी ८.४५ वा.माळीनगर हद्दीत दाखल झाला. माळीनगरच्या वेशीत तुकोबांचा पालखी सोहळा आल्यावर माळीनगर साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र गिरमे,होलटाईम डायरेक्टर परेश राऊत,जनसंपर्क अधिकारी अनिल बनकर, सरपंच अनुपमा एकतपुरे,उपसरपंच अतुल कांबळे,सदस्य, शुगरकेन सोसायटीच्या वतीने संस्थेचे चेअरमन अमोल ताम्हाणे,व्हा.चेअरमन कपील भोंगळे तसेच महात्मा फुले पतसंस्थेचे व्हा.चेअरमन महादेवराव एकतपुरे,सेक्रेटरी योगेश कचरे,त्याचप्रमाणे सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे व्हा.चेअरमन नितीन इनामके,सेक्रेटरी अजय गिरमे, व संचालक,ग्रीनसिटी,सवतगाव,बिजवडी ग्रामपंचायत, विविध संघटना,मंडळे यांनी या पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले.

     संत तुकाराम महाराज पालखी सोहळा स्टार रेसीडेन्सी समोरील या पालखी मार्गाच्या नवीन रस्त्यावर हरिनामाच्या जयघोषात उभ्या रिंगणाठिकाणी दाखल झाला.रिंगणाचा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. 

        टाळकरी,विणेकरी, पताकावाले, पकवाजे व तुळशीवाल्या महिला,आणि बाभूळगावकरांचा व डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या मानाचे अश्व यांनी सुरू असलेल्या हरिनामाच्या गजरात परिक्रमा पूर्ण करीत गोल रिंगण सोहळ्यात लाखो नयनांचे पारणे फेडले.ज्ञानोबा....तुकाराम....ज्ञानोबा.... तुकाराम या हरी गजराने माळीनगर दुमदुमले.

  यावेळी अश्वाच्या पाऊलखुनांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती.पुन्हा हरिनामाचा गजर करत अश्वांचे उभे रिंगण संपल्यानंतर मॉडेल हायस्कूलच्या प्रांगणात असलेल्या ओपन थिएटरमध्ये विसवण्यासाठी पालखी सोहळा मार्गस्थ झाला.

       पालखी सोहळा मैदानावर आल्यानंतर ग्रा.पं. सदस्य विराज निंबाळकर,भारत साठे,दादा गायकवाड व दादा लवटे यांनी पालखी रथातून खांद्यावर घेत ओपन थिएटर मध्ये आणून ठेवली. तेथे पालखीच्या पादुकांची मंत्राच्या जयघोषात विधिवत पूजा कारखान्याचे होलटाईम डायरेक्टर गणेश इनामके व त्यांच्या सुविद्य पत्नी भारतीताई गणेश इनामके या उभयतांच्या हस्ते करण्यात आली. पूजेनंतर आरती होऊन पालखी दर्शनासाठी खुली करण्यात आली. माळीनगर साखर कारखान्याने महिला व पुरुषांसाठी दर्शनाकरिता वेगवेगळ्या रांगेची सोय केल्याने शांततेत सर्वांना व्यवस्थित दर्शन घेता येत होते.यावेळी कारखान्याचे वॉचमन,होमगार्ड,पोलीस यंत्रणा यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

वारकऱ्यांसाठी माळीनगर साखर कारखान्याने सुमारे ५००० वारकऱ्यांची सालाबाद प्रमाणे दुपारच्या मिष्टान्न भोजनाची सोय गुलमोहर इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात केलेली होती. 

     दुपारी बाराच्या सुमारास पालखीने बोरगाव येथील नवीन पालखीतळावरच्या मुक्कामासाठी प्रस्थान ठेवले. माळीनगर सोडल्यानंतर पुढे गट नंबर दोन येथे माढा मतदारसंघाच्या वेशीवर सालाबादप्रमाणे आमदार बबनदादा शिंदे परिवाराने पालखी सोहळ्याचे स्वागत केले. 




फोटो ओळी - 


१)माळीनगर येथे जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण सोहळ्यात आश्वाने घेतलेली नेत्र दीपक दौड.


फोटो-

२)माळीनगर येथे जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या पूजेप्रसंगी राजेंद्र गिरमे,गणेश इनामके,भारतीताई इनामके,विराज निंबाळकर,दादा गायकवाड आदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा