Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २ जुलै, २०२५

*"मोहरम "मध्ये ढोलताशा याचा वापर न करता --हजरत इमाम हासन -हुसेन यांची शहादत आणि इस्लामचा आदर्शवाद यांचे प्रवचन करून प्रोजेक्टर द्वारे प्रबोधन करता येईल का?*

 


*इकबाल बाबासाहेब मुल्ला-- सांगली (पत्रकार)*

  *मो:-8983 587 160

इस्लाम मध्ये पवित्र मोहरम महिन्यातील *रक्तरंजित* इतिहास, हजरत हसन - हुसेन यांनी इस्लाम "जिवंत" ठेवण्यासाठी दिलेली करबला येथील *शहादत* (कुर्बानी) याचा "नव्या पिढीसाठी" विसर न पडण्यासाठी आधुनिक पद्धतीने *समाजप्रबोधन* करणे ही "काळाची गरज" निर्माण झाली आहे. *शिवजयंती* मध्ये *छत्रपती शिवाजी महाराजांचे* "पोवाडे" गायले जातात त्याप्रमाणे *मोहरम* वेळी प्रत्येक मंडळाच्या माध्यमातून हजरत हसन - हजरत हुसेन यांच्या "कर्तृत्वाचे" पोवाडे - *कव्वाली* का लावले जातं नाहीत ?? नवीन पिढीला हसन -हुसेन यांची इस्लाम साठी झालेली कुर्बानी - *शहादत*, यजिद जो *दारू - नशा* आणि वाईट कार्यात पूर्णतः बुडालेला होता, त्याच्याबद्दल माहिती *समाजाला* देणे अत्यंत गरजेचे नाही का ??? तरुण मुलांना यजिद याने हसन - हुसेन यांना क्रूरपणे मारल्यानंतर *तीन टोके* असणाऱ्या *भाल्याला* त्यांचे "शीर" ठेवून , "ठोल - ताशा" वाजवून *मिरवणूक* काढून त्यांचा *अपमान* केला, त्याची माहिती या "तरुण पिढीला" व्हायला नको का ??? 

बेसावध गाठून, *पाण्यासाठी* कासावीस झालेल्या हुसेन यांच्या *6 महिन्याच्या* बाळाला *ठार* मारणाऱ्या क्रूरकर्मा असणाऱ्या *यजिदच्या* काळ्या कृत्याचा "प्रोजेक्टर" द्वारे "*स्क्रिन वर* माहितीपट दाखवू शकत नाही का ?? ज्याप्रमाणे *हजरत टिपू सुलतान* यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या "शौर्यगाथाच्या" स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित केले जातात, विद्यार्थ्यांना *बक्षीसे* दिली जातात, त्याप्रमाणे हसन - हुसेन यांनी इस्लाम च्या "आदर्शवादासाठी" जे *बलिदान* दिले - जो असीम "त्याग" केला त्याची "माहिती" सर्वांना व्हावी या उद्देशाने सार्वजनिक कार्यक्रम /- *वक्तृत्वस्पर्धा* आयोजित केले तर *गैर* ते काय ??? मोहरम महिन्यात मध्ये पाण्यासाठी तडफडणाऱ्या हुसेन यांच्या साठी *उपवास* करावा यासाठी केलेले बयान / प्रबोधन नव्या पिढीसाठी "उद्बोधक" ठरणार नाही का ???

आपल्या घरात कोणी *मयत* झाल्यावर आपली बहीण *विधवा* झाल्यावर,तिचे "कुंकू" पुसले गेल्यावर कोणी घरासमोर *फटाके* उडवतो का?? कोणी *डॉल्बी* लावतो का?? कोणी *ढोल- ताशा* वाजवतो का?? नाही ना ?? मग ज्या मजीदने *खलिफाची* खुर्ची दबावाने बळकावली, हजरत. हसन यांना *विष* दिले, हजरत हुसेन यांचा "छळ" करून त्यांना ठार मारले, 72 स्त्रियांना *विधवा* केले, त्या आपल्या बहिणींना, त्यांच्या मुलांना *यतीम* केले, त्यांचे "उदात्तीकरण" आपण का करायचे ??



मोहरम साजरा करा, *इस्लामी झेंडे* फडकवा ,जे करायचे ते करा ,परंतु प्रेषित मोहम्मद पैगंबर याचा "आदर्शवाद" आणी *एकेश्वरवाद* आणि त्यांच्या "नातवाच्या" क्रूर हत्येचे उदात्तीकरण करू नका. राष्ट्रपिता *महात्मा गांधी* यांनी म्हंटले होते की जर इमाम हुसेन यांच्याकडील 72 "सारथी" माझ्याकडे असते तर मी केंव्हाच भारत देशाला *स्वातंत्र्य* दिले असते. 


नव्या पिढीसाठी हसन - हुसेन यांचा वाईट प्रवृत्तींविरुद्ध असणारा लढा, त्यांची *कुर्बानी* याची माहिती होणे गरजेचे आहे. म्हणूनच कव्वालीद्वारे *प्रबोधन* करणे, तसेच वक्तृत्वस्पर्धा आयोजित करणे आणि प्रोजेक्टर द्वारे त्यांचा *माहितीपट* दाखवून खराखुरा इतिहास दाखवणे आजच्या पिढीसाठी अत्यावश्यक बनले आहे.

आ . *इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध

संपादक - वेध मीडिया न्यूज, सांगली.

मोबाईल - 8983587160

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा