*मंगरूळ. प्रतिनिधी*
*चांदसाहेब शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
तुळजापुर तालुक्यातील मौजे मंगरुळ येथिल जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजी रामा राठोड यांचा सेवापूर्ती सोहळा १ जुलै रोजी कंचेश्वर मंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरवात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली
दरवर्षी विवीध क्षेत्रातील अनेक अधिकारी सेवानिवृत्त होत असतात परंतु शिक्षक हा कधीही सेवानिवृत्त होत नसून उलट ते अधिक जोमाने समाजसेवेसाठी कार्यतत्पर होतात असेच शिक्षक शिवाजी राठोड यांनी जे मंगरुळ वासियांच्या मनात जे आपले अढळ स्थान निर्माण केले आहे ते यापुढच्या काळातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य इमाने इतबारे करुन तेच अढळ स्थान निर्माण करावे , यांच्या प्रमाणेच समाजात , शाळेत व इतरही क्षेत्रात निष्ठेने , प्रामाणिकपणे, नैतिकता बाळगून सेवा देणारे शिक्षक व अधिकारी तयार व्हायला हवेत असे गौरवद्गार काढून शिक्षक -पालक यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी स्वतः सतत प्रयत्नशील राहून वेळप्रसंगी कठोर भूमिकाही घेईन असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुकुंद डोंगरे यांनी अध्यक्षीय भाषणाच्या समारोप प्रसंगी व्यक्त केले
या सन्मान सोहळ्यात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र धूरगुडे , गट शिक्षण अधिकारी अर्जुन जाधव ,माजी गट शिक्षण अधिकारी वाय के चव्हाण, विस्तार अधिकारी माने , सरपंच विजयालक्ष्मी डोंगरे व शाळेतील विद्यार्थीनी यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक देविदास राठोड यांनी व सूत्रसंचालन संजय भालेराव यांनी तर आभारप्रदर्शन सुरेश राउत यांनी मानले यासाठी जिल्हा परिषद प्रशालेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती व मंगरुळ ग्रामस्थांनी परिश्रम घेतले यावेळी शिवाजी राठोड यांच्या संपूर्ण परिवारातील सदस्य त्यांचे सहकारी मित्र व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा