उपसंपादक -नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
आज रोजी नवी दिल्ली संसद भवन परिसरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलतांना सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे शिक्षण आम्हाला भाजपकडून शिकायची गरज नाही, त्यांनी आम्हाला ते द्यायचीही गरज नाही. मी आज विचारते, भाजपवाले वारंवार सैनिकांचा अपमान करतात. पंतप्रधान म्हणतात की एक व्यापारी सैनिकापेक्षा जास्त जोखीम घेतो. हा सैनिकांचा अपमान नाही का? आमच्या कोणत्याही भाषणामुळे पहलगाम हल्ल्यातील त्या सव्वीस मृतांच्या कुटुंबीयांना वाईट वाटले असेल, तर आम्ही त्या कुटुंबीयांची हजार वेळा माफी मागायला तयार आहोत. पण भाजपचे ट्रोल्स, ट्रोलिंगआर्मी आणि अंधभक्तांची मी कधीच माफी मागणार नाही. हे सारे ऑपरेशन सिंदूरचे श्रेय भारतीय सैन्य दलाचे आहे परंतु भाजप पूर्णपणे हे श्रेय स्वतः घेत आपल्या प्रतिमेसाठी हे पीआर स्टंट बनवले. त्यांनी भारतीय सैन्य दलाचा आदर केला पाहिजे. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीही हेच म्हटले होते. आम्ही वारंवार हेच सांगतो की स्टंट करू नका. त्यांचा आदर करा. देशभक्ती आणि राष्ट्रवादाबद्दल आम्हाला कोणी शिकवू नये. आणि राहुलजी गांधी यांनी ट्रम्प, सिंदुर ऑपरेशन बाबत जे चॅलेंज दिले होते त्यापासून पळ काढण्यासाठी तमाशा व माझा नवीन खासदार म्हणून उल्लेख केला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा