कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
प्रांजल दिपाली उद्धव चव्हाण या साडे आठ वर्षाच्या चिमुकलीची किल्ले जिवधन ते वानरलिंगी पिनॅकल व्हॅली झिपलाईन आणि रैपलिंग करणारी सर्वात लहान मुल म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाले. याबाबतची सर्टिफिकेट, मेडल, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डची प्रत, ओळखपत्र व इतर साहित्य प्रांजल ला आज मिळाले.
प्रांजल ने भारतातील सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या तसेच देशातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच असलेले वानरलिंगी सुळका रैपलिंग करण्यासाठी पहाटे साडे पाच वाजता किल्ले जिवधन च्या बेस कॅम्प वर पोहोचली. एस एल ऍडव्हेंचर या गिर्यारोहण क्षेत्रातील प्रसिद्ध असणाऱ्या कंपनीचे संचालक, एव्हरेस्ट वीर लहू उघडे यांचे मार्गदर्शनाखाली तिने किल्ले जिवधन सर करण्यास सुरवात केली. जवळपास 4 km घनदाट जंगलातून व 2 km गिर्यारोहण करून ती साडे आठ वाजता किल्ले जिवधन वर पोहोचली. जिवधन ते वानरलिंगी पिनॅकल व्हॅली हे 250 फूट अंतर तिने झिपलाईने पूर्ण केले. वानरलिंगी सूळक्यावर पोहोचल्यानंतर तिने तिरंगा फडकवत जल्लोष केला. 350 फूट उंची असलेले वानरलिंगी सुळका हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच तितकेच अवघड सुळका आहे. प्रांजल ने 8 मिनिटांमध्ये रॅपलिंग करत सुळक्यावरून मोठ्या आत्मविश्वासानेखाली उतरली. प्रांजल हे सर्व करत असताना सुरक्षिततेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले गेले होते. नियमाप्रमाणे सर्व परवानग्या घेऊन प्रांजल चे इन्शुरन्स सुद्धा काढले गेले होते.
प्रांजल ही देवतळा, लातूर येथील असून इंदापूर मधील डॉ. कदम गुरुकुल शाळेमध्ये इयत्ता तिसरी शाळेमध्ये शिकते. प्रांजल चे वडील इंदापूर तालुक्यात महसूल विभागात कार्यरत आहेत.
प्रांजल चा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मधील हा तिचा तब्ब्ल अकरावा रेकॉर्ड ठरला आहे. यामध्ये 1) महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर सर करणारी सर्वात लहान मुलगी.. वय 4 वर्ष 3 महिने
2) 40 प्रसिद्ध साहित्याच्या लेखकाची नावे 49 सेकंदात सांगणारी सर्वात कमी वयाची मुलगी
3) 45 भारतातील प्रसिद्ध व्यक्तीच्या समाधी स्थळाची नावे 54 सेकंदात सांगणारी सर्वात लहान मुलगी
4) भारतातील 41 प्रसिद्ध नदी च्या उगमस्थान नावे एका मिनिटात सांगणारी सर्वात कमी वयाची मुलगी
5) लग्नात मंगलअष्टकेचे गायन करणारी सर्वात लहान मुलगी
6) महिषासूर मरदिनी स्तोत्र गायन करणारी मुलगी
7) रावण रचित शिव तांडव स्तोत्रगायन करणारी मुलगी.
8) समुद्रामध्ये स्कुबा डायविंग करणारी मुलगी. वय 8 वर्ष 2 महिने 8 दिवस
9) राष्ट्रगीत हार्मोनियम वर वाजवणारी सर्वात लहान मुलं, वय 8 वर्ष 2 महिने 30 दिवस
10) महाराष्ट्र राज्य गीत हार्मोनियमवर गायन करणारी सर्वात लहान मुलं, वय 8 वर्ष 5महिने
11) वानरलिंगी पिनॅकल व्हॅली झिपलाईन आणि रॅपेल करणारी सर्वात लहान मूल, वय 8 वर्ष 10 दिवस.
प्रांजल च्या रेकॉर्ड बद्दल समाजमाध्यमातून तिचे कौतुक केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा