*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
आषाढी एकादशीच्या निमित्ताने भगवंत मंदिरासमोर वारकऱ्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने 525 लिटर दुधाचे सुमारे 12 000 वारकऱ्यांना वाटप करण्यात आले यावेळी आयोजक -आनंद काशीद म्हणाले आषाढी एकादशीच्या निमित्ताने दूध वाटून वारकऱ्यांच्या आम्ही सेवा करत आहोत या वारकऱ्यांच्या सोबत श्री भगवंत व श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या आशीर्वादाने जरांगे पाटलांच्या लढ्याला यश येईल आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल असा विश्वास आम्हाला वाटतो निस्वार्थ भावनेने सेवा केल्यानंतर अपेक्षित फळ पांडुरंग येतोच आणि मराठ्यांनी वेळोवेळी निस्वार्थपणे सर्व समाजाचे सेवा करण्याचा प्रयत्न गरज पडल त्यावेळेस केलेला आहे त्याचेच फळ मराठ्यांना शंभर टक्के आरक्षणाच्या रूपाने मिळणार आहे 29 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील कोट्यावधी मराठ्यांसह मुंबईमध्ये आरक्षणाच्या लढ्यासाठी जाणार आहेत त्या लढ्याला श्री विठ्ठल रुक्मिणी श्री भगवंत व वारकऱ्यांच्या आशीर्वादाने यश मिळो एवढीच प्रार्थना या निमित्ताने करत आहोत
सकाळी दहा वाजता दूध वाटपाला सुरुवात केली असता दुपारी तीन वाजेपर्यंत 525 लिटर दूध वाटप करण्यात आले
या दूध वाटप करीता ज्योतीराम शिंदे, कृष्णा चिकणे ,भिमराव गंभोरे, रामराजे ताकभाते ,रणजित बर्डे विकास माने, संदीप शिंदे, धनराज गरड, जयसिंग मोरे, बालाजी ठोंगे पांडुरंग घोलप आदींनी परिश्रम घेतले...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा