*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
"कष्टाशिवाय यश नाही आणि समर्पणाशिवाय संस्कृती जपता येत नाही!" हा विचार केवळ पुस्तकी नाही… तो माळशिरस तालुक्याच्या प्रत्येक गल्लीत आणि गल्लीतील प्रत्येक मनात अनुभवता येतो.कारण,इथं एक नाव आहे… *"जयसिंह मोहिते-पाटील"* ज्यांना आपुलकीनं सगळे *"बाळदादा"* म्हणतात
आणि आदरानं ओळखतात *"राबणाऱ्यांचा विठ्ठल"* म्हणून..संस्कृती जपणारे श्रमशील नेतृत्व बाळदादा हे केवळ नेतृत्व करतात असे नाही,तर प्रत्येक उपक्रमात सहभाग घेतात.ते स्वतः मैदानात उतरतात,लोकांमध्ये राहतात आणि सर्वसामान्यांचा सहभाग घेत उत्सव आणि उपक्रम यशस्वी करतातच.त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे सहभाग,श्रम आणि साधना.
फक्त महिलांसाठी साजरा होणारा नागपंचमी उत्सव महिलांना मंच मिळावा,लोकसंस्कृतीत त्यांचा सहभाग वाढावा या हेतूनं २८,२९ जुलै २०२५ रोजी नागपंचमी सण हा फक्त महिलांसाठी उपक्रम राबवण्यात आला.पारंपरिक खेळ,गाणी,उत्तम दर्जाचे आणि रास्त भाव असलेले खाऊचे स्टॉल,प्रथमोपचार सोय-सुविधा,पावसाचा व्यत्यय नसावा म्हणून केलेली वॉटरप्रुफ मंडपाची सोय,महत्वाचं म्हणजे यामध्ये रेकॉर्डब्रेक गर्दीत सहभागी प्रत्येक महिलांच्या सुरक्षिततेची घेतलेली काळजी...यातून महिला सशक्तीकरणाचे आणि आत्मविश्वासाचे सामाजिक उदाहरण घालून दिले.लोकमानस घडवताना केवळ कला आणि विज्ञान पुरेसे नाही,तर अध्यात्मही तितकंच महत्त्वाचं असतं.बाळदादांनी हे ओळखून काही वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आणि यशस्वी देखील केले.
विठ्ठल हा देव वारकऱ्यांच्या भक्तीत,सर्वसामान्यांच्या सोबत उभा असतो…तो शेतकऱ्याच्या,मजुराच्या आणि जनसामान्यांच्या रांगेत उभा राहतो.
आदरणीय बाळदादा हे त्याच विठ्ठलाचे जिवंत रूपच...ते आदेश देत नाहीत,सहभागी होतात.ते भाषण करत नाहीत,कृती करतात.ते मंचावर न थांबता मैदानात उतरतात.आणि म्हणूनच ते आहेत. *"राबणाऱ्यांचा विठ्ठल"*
आनंदयात्री प्रत्येक मनात आनंद पेरणारे...
"आनंद" हा शब्द फक्त हसू नसतो,तो एक अनुभव असतो.बाळदादांनी ‘आनंदयात्रा’ भरवली तेंव्हा ती केवळ एक सहल नव्हती,ती विद्यार्थ्यांच्या मनात विचार,विज्ञान आणि संस्कार पेरणारी प्रेरणायात्रा होती.या यात्रेत सहभागी विद्यार्थ्यांनी पाहिलं विज्ञानाचा उजेड,इतिहासाची प्रेरणा,लोकसाहित्याचं वैभव आणि नेतृत्वाचं शहाणपण.यात्रा ही त्यांच्या दृष्टीनं ‘नेहमी शिका,नेहमी फिरा आणि नेहमी विचार करा’ या मंत्राची अंमलबजावणी होती.बाळदादांचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नाही.त्यांनी दिलंय समाजाला संस्कृतीचं जतन,कलेचं व्यासपीठ आणि परंपरेचं नवसंजीवन.
त्यांनी घडवलेले अनेक उपक्रम
शिवनाट्य ‘रयतेचा राजा,राजा शिवछत्रपती’,अकलूजमध्ये प्रजासत्ताक दिनी पथसंचालन,स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव-अमृतमोहत्सव,शिवसृष्टी सोहळा,लावणी स्पर्धा, लेझीम,पारायण,ग्रामदैवता श्रीअकलाईदेवी भंडारा(यात्रा)सोहळा,कलशारोहण सोहळा,नामजप,महाआरती,गौरव मराठी मातीचा,गौरव भारतीय लोककलेचा,गणेशोत्सव,शिवजयंती उत्सव,पाटील वाड्यातील गौराईपूजन आणि केवळ महिलांसाठीचा नागपंचमी उत्सव यासह नीतीमूल्य,संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपणारे असे अगणित उपक्रम...
या सर्व उपक्रमांत बाळदादांनी प्रत्येकास सहभागी करून घेतलं यात कोणताही भेदभाव नसतो...सामान्यजन,महिलाभगिनी,विद्यार्थी,शिक्षक,कलाकार,नागरिक,शेतकरी,कष्टकरी,उद्योग- व्यावसायिक,सामान्य कार्यकर्ते तर कधी नागरिक...यांना आयुष्याची एक विलक्षण अनुभूती आणि समृद्ध शिदोरी दिली.बाळदादांच्या कामाची खरी ओळख म्हणजे *"ते सर्वांना सोबत घेतात."कोणताही कार्यक्रम असो,ते कधीही 'मी' म्हणत नाहीत,ते नेहमी म्हणतात ‘आपण’.* त्यांचं नेतृत्व विलक्षण,विनम्र आणि विधायक आहे.लोकांचा विश्वास,कार्यकर्त्यांचं श्रद्धास्थान.
आज अनेकांना प्रश्न पडतो –
*"बाळदादा हे एवढं सगळं कसं करू शकतात?"*
उत्तर सोपं आहे ...त्यांचं नेतृत्व हे पदासाठी नाही, तर लोकांच्या प्रगतीसाठी आहे.त्यांचा उद्देश सत्ता नव्हे,संस्कृती आहे.आणि त्यांची ही ओळख श्रमातून कमावलेली आहे."
"राबणाऱ्यांचा विठ्ठल… आनंदयात्री बाळदादा" हे शीर्षक हे केवळ उपमा नाही,तर
ते एक जिवंत मूल्य आहे…एक कार्यशैली आहे…आणि नव्या पिढीसाठी एक दिशादर्शक दीपस्तंभ आहेत.बाळदादांचा ठाम विश्वास हा त्यांच्या कामात, कार्यकर्त्यांवर आणि समाजाच्या प्रगतीवर सदैव दिसून येतो. एखादी योजना राबवायची असेल तर ती पूर्ण आत्मविश्वासाने,वेळेच्या आधी आणि दर्जा राखून पूर्ण करतात. त्यामुळेच *"बाळदादा बोलले म्हणजे काम झाले"* ही लोकांची लोकभावना आहे.आदरणीय बाळदादा हे संयम,दूरदृष्टी आणि व्यापक लोकसंपर्क यांचे समन्वय असलेले मुसद्दी व्यक्तिमत्व आहे.शांतता व समन्वय समिती यापैकीच एक उदाहरण... समाजाच्या प्रत्येक थराशी नाळ जुळवून निर्णय घेणं,ही त्यांची खासीयत.कोणतीही समस्या असो बाळदादांच्या समजूतदार हस्तक्षेपाने ती सामोपचाराने सुटते,हीच त्यांची खरी मुसद्दीपणाची ओळख.कार्यकर्त्यांशी आपुलकीने बोलणं,जनतेच्या मनातील भावना समजून घेऊन धोरण ठरवणं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणं,यामूळचं बाळदादांचा समाजमनावर प्रभाव आहे.
बाळदादा म्हणजे ..
🌾 कष्टांची पूजा
🎭 कलेचं संगोपन
👬 युवकांची दिशा
👥 सामाजिकतेचा आधार
👑 आणि संस्कृतीचा रक्षक…
आजवर बाळदादांचे सर्व उपक्रम केवळ इव्हेंट म्हणून उरत नाहीत. त्यातून समाजाला ‘जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन’ मिळतो.समाजोन्नतीची वाट,नव्या पिढीसाठी एक प्रेरणादायी वाटचाल ठरते.
🏔️ निश्चल.. म्हणजे स्थिर मूल्यांवर विश्वास पर्वत म्हणजे न हलणारा,न डगमगणारा.
तो हवामान बदललं तरी थांबत नाही… त्याचं अस्तित्व जसं आहे, तसंच तो उभा असतो.
बाळदादांची जीवनमूल्यं, संस्कृतीविषयक श्रद्धा आणि कार्यशैली ह्या पर्वतासारख्या आहेत.कितीही राजकीय वा सामाजिक परिस्थिती बदलली, तरी त्यांचा सहभाग आणि संयम तसाच राहतो.कोणताही उपक्रम असो,सर्वांना सामावून घेणं आणि संस्कृतीला जपणं हे त्यांचं ब्रीद असतं.‘महानदीसारखे प्रवाही आणि पर्वतासारखे निश्चल’ हे बाळदादांचे केवळ वाक्य नाही,तर तेच त्यांचे कार्यविधान आहे.जेव्हा दिशाहीन समाजाला गरज असते,तेव्हा बाळदादा विचारांची दिशा देतात.
जेव्हा कलेला मंच लागतं,तेव्हा ते व्यासपीठ उभं करतात.जेव्हा श्रद्धा आणि श्रम यांचा संगम हवा असतो,तेंव्हा तेंव्हा ते स्वतः पुढे येतात.आजच्या धकाधकीच्या,गोंधळलेल्या काळात सामाजिक आणि सांस्कृतिक अधोगतीला तोंड देताना बाळदादांसारखे श्रमशील, संवेदनशील,समर्पित आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणजेच समाजासाठी एक *विठ्ठलस्वरूपच* आहे.
*...म्हणूनच ते केवळ नेता नाहीत.ते आहेत विचारांचे वहाते झरे आणि श्रद्धेचे स्थिर शिखर.*
*अन् राबणाऱ्यांचा साक्षात विठ्ठल...!*
*- उत्कर्ष शेटे*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा