*उपसंपादक -नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळीनगर या संस्थेतील ८१ प्रशिक्षणार्थींची विविध नामांकित कंपनीमध्ये निवड झाली आहे.दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचलित,औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळीनगर या संस्थेची स्थापना २००७ साली झालेली असून या संस्थेमधून जवळपास २७०० ते ३२०० प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण घेतले आहे.तसेच यातील अनेक प्रशिक्षणार्थी नामांकित कंपनीत नोकरी करीत असून काही प्रशिक्षणार्थी स्वतःचा व्यवसाय करीत आहेत.
सन २०२४-२५ साली प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन त्यांना कॅम्पस इंटरव्यूद्वारे टाटा ऑटो कॉम,जीवाय बॅटरी प्रा.लिमिटेड रांजणगाव,पियाजो प्रा.लि.बारामती,फियाट इंडिया लि. रांजणगाव,व्हील्स इंडिया लि.या नामांकित कंपन्यांमध्ये डिझेल मेकॅनिक १७, मोटार मेकॅनिक २०, वेल्डर ८,फिटर १८ व इलेक्ट्रिशियन- १८ असे एकूण ८१ प्रशिक्षणार्थींची मुलाखतीद्वारे अप्रेंटिसशीपसाठी निवड केलेली आहे.
माळीनगरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींचे संस्थेचे चेअरमन राजेंद्र गिरमे,व्हा.चेअरमन नितीन इनामके,सेक्रेटरी अजय गिरमे, खजिनदार ज्योतीताई लांडगे, संचालक अनिल रासकर,ऍड.सचिन बधे,रत्नदीप बोरावके,डॉ.अविनाश जाधव,पृथ्वीराज भोंगळे,कल्पेश पांढरे,दिलीप इनामके,संचालिका लिनाताई गिरमे व विश्वस्त मंडळ यांनी अभिनंदन केले.
या प्रशिक्षणार्थींना संस्थेचे प्राचार्य विराज बधे तसेच विनायक सावळे,मारुती महादार (इलेक्ट्रिशियन),सतीश आडत,विठ्ठल पवार(मेकॅनिक मोटर व्हेईकल),नवनाथ लोखंडे,महादेव
भोसले(फिटर),वेंकटेश दबडे (डिझेल मेकॅनिक), सचिन सोनवणे(वेल्डर),अमर राठोळ, शब्बीर मनेरी, प्रतिभा पांढरे यांचे मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा