Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १४ जुलै, २०२५

*दि सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या वतीने भाटघर व वीर धरणाच्या जलाशयातील पाण्याचे जलपूजन.*

 


उपसंपादक- नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्यूज मराठी

माळीनगर येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरी आणि शुगरकेन प्रोड्युसर्स वि.का.स सोसायटी माळीनगर या दोन्ही संस्थांच्या सभासदांकडून सालाबाद प्रमाणे या ही वर्षी भाटघर व वीर धरणाच्या जलाशयाची आरती करून व श्रीफळ सोडून जलपूजा करण्यात आली.

           ज्यावेळेस भाटघर व वीर धरण पूर्ण झाले आणि त्याचे पाणी राज्यात प्रथम माळीनगर मधील शेतकऱ्यांनी पाणीपुरवठा सहकारी सोसायटी स्थापन करून ब्रिटिश काळात या पाण्याचा करार करून पाणी घेणारी पहिली सोसायटी म्हणून जलसंपदा विभागाकडे नोंद असलेली दिसून येते आहे.गेली कित्येक वर्षे ही जलपूजेची प्रथा या दोन्ही संस्थांच्या सभासदांनी जोपासली आहे.

           धरणाचे पाणी हे थंड असते ते पिकाला चालत नाही या भावनेतून पूर्वी शेतकरी नवीन धरणाचे पाणी पिकास घेण्यास नकार देत होते.अशावेळी माळीनगर येथील शेतकऱ्यांनी प्रथम हे धरणाचे पाणी १९३२ सालापासून घेण्यास सुरुवात केली.भाटघर धरणातील पाणी वीर धरणात येऊन ते डावा व उजव्या कालव्यातून पुणे जिल्ह्यातील बारामती,इंदापूर, सातारा जिल्ह्यातील फलटण तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस,पंढरपूर,सांगोला या सहा तालुक्यांना मिळते. 

        पावसाला सुरुवात झाली की,अशा या दोन्ही धरणात साठणाऱ्या पाण्याची पूजा करून यंदा पूर्ण धरण भरू दे अशी श्रीफळ सोडून व आरती म्हणून प्रार्थना केली जाते.ही प्रथा पाळणारी माळीनगरची ही तिसरी पिढी आहे.सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन राजेंद्र गिरमे,होलटाईम डायरेक्टर गणेश इनामके,होलटाईम डायरेक्टर परेश राऊत,शुगरकेन सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे,व्हा.चेअरमन कपिल भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक कुणाल इनामके,सुरेश राऊत व संस्थेचे कर्मचारी आकाश पांढरे,गणेश गिरमे आदींनी या दौऱ्याचे आयोजनाची भूमिका बजावली.या दौऱ्यात धरणाच्या पुजेप्रसंगी शुगरकेनचे चेअरमन अमोल ताम्हाणे,व्हा. चेअरमन कपिल भोंगळे, संचालक सुरेश राऊत,कुणाल इनामके,जयवंत चौरे,मनीष रासकर,ज्येष्ठ सभासद जगन्नाथ झगडे,रमेश झगडे,पत्रकार मिलिंद गिरमे,हेमंत रासकर, किरण झगडे,अरुण एकतपुरे, दत्तात्रय पांढरे,सुनील पांढरे, दीपक गिरमे,आदेश बोरावके, अविनाश पांढरे,सुरेश होले, पांडुरंग होले,राहुल पांढरे, कुंडलिक पांढरे,धनेश शिंदे,रुपेश गिरमे,घनश्याम भोंगळे,कल्पेश पांढरे,विनीत रासकर,रितेश राऊत,अमित टिळेकर,विशाल जगताप,अंबर जगताप,सचिन राऊत,समीर झगडे,प्रतीक भोंगळे,योगेश बोरावके,धीरज गिरमे आदी सभासद सहभागी झाले होते.१३ जुलै अखेर भाटघर धरणात ७९.२०% पाणी तर वीर धरणात ८७.२६% पाणीसाठा झाला आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा