*इकबाल बाबासाहेब मुल्ला-- सांगली (पत्रकार)*
*मो:-8983 587 160
*कमी मुलांमुळे आपला समाज पुढील शतकांपर्यंत जगणार नाही टिकणार नाही*
प्रत्येक *नवविवाहित जोडपे* आजकाल फक्त "एकच मूल" हवे असा अट्टाहास धरते. प्रत्येक जण *फक्त 1 मूल* जन्माला घातले तर पुढील *50 वर्षाचे* प्रजनन व जन्मदर चे "गणित" कसे "विस्कटणार" आहे याचा "खुलासा" करणारा, *आत्मचिंतन* करणारा,समाजाचे *डोळे* उघडणारा, एकच मुल हवे असे म्हणणाऱ्या "जोडप्यांसाठी" *डोळ्यात "अंजन"* घालणारा हा लेख ! *मुस्लिम* समाजात प्रत्येक पालकांना किमान 2-3 मुले असतात. त्यामुळे *प्रजननदर* काटेकोर राहतो.त्यामुळे संपूर्ण "जगाने" याची दखल घेऊन *अनुकरण* करणे ही काळाची गरज आहे
*लोकसंख्या घटवण्याचे शांतपणे रचलेले कट - कारस्थान !*
एक उदाहरण पाहा:
सर्वसाधारण *मुस्लिम* समाजाचा विचार न करता , अन्य *कोणत्याही* समाजाचा" विचार करा...!
समजा आपल्या समाजात आज 1000 लोक आहेत .त्यांचा विवाह झाला मग 2000 जोडली झाली.
जर प्रत्येक जोडपं फक्त *एकच मूल* जन्माला घालत असेल काही जोडप्याना मूल होतं नाही हे (गृहीत) धरले तर पुढच्या पिढीत जास्तीत जास्त 450-500 मूलं होतील.
या 500 मुलांचे विवाह 500 मुलींशी केल्यास *तिसऱ्या पिढीत* ही संख्या फक्त 200-220 इतकी मुले जन्माला येतील. आणि *4 थ्या पिढीत* समाज जवळपास *0* म्हणजे *शून्य !*
हे एक जळजळीत वास्तव आहे तर्क नाही, हे एक *गणित* आहे, विचार करा !
*पुढील शतकात* समाज "टिकणे" अवघड ! कारण समाजाच्या चारही बाजूंना *अंधारच - अंधार* असणार !
आज 2025 चा विचार करता मुलींचे विवाह 25-30 वर्षांपर्यंत होतं नाहीत.
त्याशिवाय मुलांचे वय देखील *30-35* पर्यंत असते. जर ....
" विवाह" *उशिरा* होतं असेल ...
नवदाम्पत्यांना केवळ *1 मूल* असेल
"स्वातंत्र्याच्या" नावाखाली *तुटलेले* कुटुंब असेल..
त्यामुळे *वृद्ध" आई - वडील* एकटे पडले असतील..
आणि 21 व्या शतकातील ही आपली पिढी आतून *पोखरलेली* असेल, तर
या समाजाला आपण "सुशिक्षित" म्हणायचे का ???
*घर मोठे, पण माणसे नाहीत !*
" नवीन विवाह झालेली *सून* म्हणते... आम्हाला आयुष्याचा "आनंद" घ्यायचा आहे!त्यामुळे *फॅमेली प्लॅनिंग* मध्ये 4-5 वर्ष जातात.
आमचे *करिअर* थांबायला नको
जास्त मुलांमुळे *डिलिव्हरीने* माझे "शरीर" खराब होईल, समाज नावे ठेवतो म्हणून कोणी "*वांझ"* म्हणू नये मी 1 मूल जन्माला घालणार आहे, असं ती म्हणते.
विचार करा हे योग्य आहे का ??
भविष्याचा विचार करता ,मूल *जन्माला* घालणे हे केवळ प्रेमाचं *स्मृतिचिन्ह* नसून समाजाला "दाखवण्याची" *दिखाव्याची* " गोष्ट बनली आहे ही विचारसरणी "मूल्यहीन", धर्महीन, *तथ्यहीन* असून भविष्याच्या "दुःखाची नांदी" ठरत नाही का ??
*मुलीचे वडील कारणीभूत आहेत का ?*
30 वर्षांपूर्वी वडील *स्वतः* २२–२५ वयात विवाह करतो,त्यांना अपत्ये होतात,पण स्वतःच्या *मुलीचा विवाह* 30 वर्षानंतर,तिचे करियर झाल्यानंतर.केला जातो. परखडपणे विचार करता आज मुलीचे *करियर* निश्चितपणे होते पण 30 वर्षापर्यंत *मुलीचे* चेहऱ्यावरील *तेज* संपलेले असते, त्यामुळे मुलींना उचित योग्य "वर" मिळत नाही अशी उदाहरणे आहेत.त्यामुळे मुलींचे विवाह *वडिलांच्या स्टेट्स* मुळे लांबतात. आज समाजात हेच चाललं आहे ना ?
आज 30 वर्षाच्या मुलींमध्ये *प्रजनन* समस्येचं प्रमाण आहे. प्रत्येक ४ जोडप्यांपैकी एकीला ला मूल होण्यात *अडचण* आहे. याचा विचार कोण करणार ?? *हजारो तरुण-तरुणी* लग्नासाठी अजूनही वाट बघत आहेत. हुशार समाजाचे याबाबत अजूनही *मौन* आहे.
वास्तविक विवाह हे केवळ "पवित्र बंधन" नाही, तो *धार्मिक कर्तव्य* आहे,तो आपण काटेकोर पार पाडतो का ??
मुलांच्या विवाहाला जबाबदारीपासून दूर ठेवणे, विवाह सतत *टाळणे* हे कशाचे लक्षण आहे.
*पालकांनी आता "हे" करावे* मुलांचे विवाह वेळेवर करणें आवश्यक
कोणत्याही परिस्थितीत मुलाचा विवाह 23-24 आणि *मुलीचा विवाह* 22-23 पर्यंत व्हायलाच हवा !
आता फक्त एक नव्हे तर *किमान तीन* मूलं आवश्यक आहेत.
एकच मूल हवे " ही मानसिकता समाजाला *शून्यावर* आणते आहे
समाजातील *जेष्ठांची* - पुढार्यांनी या विषयावर "मतप्रदर्शन" केले पाहिजे. *प्रवचन* केले पाहिजे .
मुलंच नसेल तर काय ?? समाजाचा *ऱ्हास* हा धर्माच्या ऱ्हासाहून मोठा प्रश्न नाही का ??
मुलीच्या वडिलांनी दक्षता घ्यावी. मुलाच्या "अपेक्षा" कमी करून *समजूतदारपणा* दाखवण्याची गरज !
जर मुलीचं *आयुष्य* वाचवायचं असेल, तर वेळेत विवाह व्हावा.अन्यथा "वाममार्गाला" जाण्याचा धोका !
"कमी मुले" हा *लोकसंख्या* घटवण्याचा कट असून समाज "पुढील शतकांपर्यंत" न टिकवण्याचे "षडयंत्र" आहे. समस्त *पालक* या गंभीर धोक्याबाबत विचार करतील ही अपेक्षा आहे.
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल -8983587160
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा