*इकबाल बाबासाहेब मुल्ला ( पत्रकार) सांगली.*
*मो.8983 587 160
राज - उद्धव हे एकत्र येणे हे *भाजपा* - *एकनाथ शिंदे* आणि *अजित पवार* गटासाठी "धोक्याची घंटा" ठरणार आहे. कारण मुंबई आणि विशेषतः *ठाणे* परिसरात एकनाथ शिंदे यांची "एकाधिकारशाही" आहे. त्यांचा तो 'गड *नेस्तनाबूत* करण्यासाठी आणी विशेषतः भाजपाला मुंबईत "हद्दपार" करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज यांनी "*ऐक्याची* जी व्रजमूठ बांधली आहे त्याच्यावर *मुंबई महापालिका* निवडणुकीततसेच भविष्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत *यशाचे तोरण* बांधण्यासाठी *मतदार* जीवाचे रान करणार यात "तिळमात्र" शंका नाही.
उद्धव आणि राज यांचे "मनोमिलन" झाल्याने महाराष्ट्रातील तमाम मराठी कुटुंबात *सण* साजरा झाला, "ठाकरे ब्रँड" चे एकत्र येणे हे महाराष्ट्राच्या इतिहासात एक *सुदिन* म्हणून निश्चितपणे ओळखला जाईल.
आता भविष्यात *महाआघाडीमध्ये* काँग्रेस - शरद पवार राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे शिवसेना , मनसे ,असे सूत्र असेल. भाजप सह *महायुती* मध्ये उद्धव - राज यांची एकी झाल्याने "जोर का धक्का धीरे से लगे.."याप्रमाणे निश्चितपणे चिंतेचे वातावरण आहे. आता महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत मराठी माणसाची *माती* आणि मराठी जागा *अदानी - अंबानी* या मोदीमित्रांकडे जाणार नाही याचे समाधान वाटेल.कारण अस्सल मराठीचा *स्वाभिमान* बाळगणारे असणारे, मराठीचा *जिवंत रक्त* असणारे, "मुलूखमैदान तोफ" असणारे, मराठीची *पारख* करणारे उद्धव ठाकरे व राज ठाकरे तुम्हां - आम्हांसाठी मराठी *वाचवण्यासाठी* एकत्र आले आहेत .
. *इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक -वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल -8983 587 160






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा