गरिबीच्या झळा सोसत
आयुष्य आपले घडविले
धरून शिक्षणाची कास संकटांना पायदळी तुडविले
वैज्ञानिक,मिसाईल म्यान
जगी नाव त्यांनी गाजविले
कर्तृत्वाचा उमटवला ठसा
बलशाली देशाला बनविले
अग्नीपंख गाजले जगी
शान देशाची वाढवली
क्षेपणास्त्र बनविले ऐसे की
झोप शत्रू राष्ट्रांची उडविली
अन्विक समृद्ध शक्तीशाली
म्हणून भारताला जगी गौरविले
गुर्गुरणाऱ्या शत्रूंना नमविले
जगी नाव देशाचे उंचावले
आयुष्य सारे देशसाठी अर्पिले
जगी महान वैज्ञानिक झाले.
नविकाच्या घरी हा हिरा जन्मला,
भारतभूला त्यांनी चमकविले
करी जग त्यांना सलाम.
डॉ.ए पी जे अब्दुल कलाम
नूरजहाँ शेख
गणेशगाव
ता.माळशिरस
जिल्हा सोलापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा