Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २७ जुलै, २०२५

*सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा-- सेवारत्न,-सतीश कचरे*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्या असे आवाहन मंडल कृषी अधिकारी अकलूज ISO9001 :2015 सेवारत्न सतीश शांताबाई कुंडलिक कचरे महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांनी 25 जून 2025 रोजी सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगामासाठी लागू केली आहे .अकलूज मंडल कृषी अधिकारी कार्यक्षेत्रातील 36 गावांमध्ये या मध्ये अकलूज,लवंग महाळुंग वेळापूर माळशिरस या महसूल मंडळ मधील अधिघोषित क्षेत्रामध्ये खरीप पिके बाजरी, भुईमूग, मूग, तूर ,उडीद, मका व कांदा पिकास या योजनेतून विमा भरता येणार आहे या मध्ये बाजरी - 70 . 44 रु ,भुईमूग - 92 . 25 रु, मुग - 70.00 रु, उडीद -500 रु, तूर - 744.36 रु, मका - 540 रु, व कांदा साठी 680 रुविमा हप्ता प्रतिहेक्टरी भरायचा आहे व यासाठी जोखीम स्तर 70% आहे .विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 आहे .शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी सातबारा, आठ, ॲग्री स्टॅक नोंदणी क्रमांक (फार्मर आयडी ),राष्ट्रीयकृत बँक पासबुक, सदैव चालू असलेला मोबाईल नंबर, आधार कार्ड सह एग्रीकल्चर विमा कंपनी विमा प्रतिनिधी श्री अभिषेक कांबळे मोबाईल नंबर8698800817,महा-ई-सेवा केंद्र,राष्ट्रीयकृत बँक,मोबाईल ॲप व विमा कंपनी वेबसाईट www.aicfindia.com,www.pmfby.gov.in इत्यादीच्या साह्याने शेतकरी बांधवांना विमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे .जर विमा माही सेवा केंद्रातून (CSC )भरणार असेल तर सेवा केंद्रांना चाळीस रुपये प्रति शेतकरी मानधन देण्यात येणार आहे .शेतकऱ्यांच्या पिकात बदल असेल तर शेतकरी बांधवांनी अंतिम मुदत अगोदर दोन दिवस विमा कंपनीस पीक बदल कळविणे बंधनकारक आहे .अधिक माहितीसाठी कंपनी विमा प्रतिनिधी नजीकचे कृषी विभागाचे कार्यालय ग्राम स्तरावरील अधिकारी व कृषी पोर्टल14447 हेल्पलाईन इत्यादीचा उपयोग करू शकतात .मंडल कृषी अधिकारी अकलूज कार्यक्षेत्रातील ३६ गावांची जून व जुलै महिन्यात पावसाचा खंड 21 दिवस व २० दिवस आहे व जुलै महिन्याची सरासरी 79 मिलिमीटर आहे .यामुळे खरीप पिकाच्या सरासरी उत्पादनात घट येऊ शकते !शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई पीक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक घटक,कीड व रोगांचा प्रादुर्भाव इत्यादी कारणामुळे पीक कापणी प्रयोगाद्वारे येणारे सरासरी उत्पादन हे त्या महसूल मंडल मधील उंबरठा उत्पादन (त्या महसूल मंडल मधील सात वर्षाच्या सर्वोत्तम उत्पादन पाच वर्षाची सरासरी xजोखीम स्तर ( 70%) यापेक्षा कमी असेल तर त्या पिकाचा विमा घेतलेल्या त्या महसूल मंडल मधील सर्व शेतकऱ्यास सम प्रमाणात नुकसान भरपाई मिळणार आहे .तरी मंडल कृषी अधिकारी अकलूज कार्यक्षेत्रातील सर्व लाभार्थ्यांनी विमा उतरण्याची आव्हान कार्यालय अधिकारी कर्मचारी यांनी केले आहे .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा