Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ६ जुलै, २०२५

*राष्ट्रीय हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या थोरला मंगळवेढा तालीम सवारीची मिरवणूक सोहळा संपन्न*

 


*सोलापूर---प्रतिनिधी*

 *आंबिद. बागवान*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

राष्ट्रीय हिंदु-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले थोरला मंगळवेढा तालीम सोलापूर येथील पीर बडा मंगलबेडा (अहले हरम) सवारीचा मिरवणूक सोहळा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. यंदा आषाढी एकादशी आणि मोहरम उत्सव एकत्र आल्याचे औचित्य साधून सवारीच्या मिरवणुकीत चौपाड विठ्ठल मंदिरातर्फे पीर मंगळवेढे साहेबांना तुळशीहार अर्पण करण्यात आला. तर सवारीकडूनही श्री विठ्ठल-रुक्मिणीला तुळशीहार अर्पण करण्यात आला. यानिमित्ताने सामाजिक आणि धार्मिक ऐक्याचा अनुबंध पाहायला मिळाला.



सकाळी आठ वाजता फातेहाखानी विधी संपन्न होऊन पीर मंगलबेडा सवारीच्या जय जयकारात मिरवणुकीस प्रारंभ झाला. ही मिरवणूक पारंपारिक मार्गाने चौपाड विठ्ठल मंदिरासमोर पोहोचल्यानंतर तेथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून मंदिराकडून पुजारी नितीन कमलाकर कुलकर्णी आणि विश्वस्त रमेश खरात यांनी सवारीला तुळशीहार आणि श्रीफळ अर्पण केला. तर सवारीच्यावतीनेही मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मूर्तीना तुळशीहार अर्पण करण्यात आला. पुढे मिरवणूक आभार शरीफ येथे पोहोचल्यानंतर तेथे फातेहाखाली विधी झाला. तेथून मिरवणूक पूर्वस्थळी पोहोचली. मिरवणुकीच्या अग्रभागी हिरवे निशाण आणि भगवे निशाण घेतलेले दोन घोडेस्वार होते. हलग्यांचे पथक, ब्रास बँड पथक, ताशा पथकाच्या सहभागातून निघालेल्या या मिरवणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने, अनिकेत पिसे, बिज्जू प्रधाने, अमर धंगेकर, सतीश प्रधाने, सागर पिसे, सवारीचे मानकरी धनराज दीक्षित, दीक्षित, रवींद्र दुबे, माजी नगरसेवक सदाशिव येलुरे, सुनील शेळके, विकास गायकवाड, मुदस्सर शेख, मिनाजुद्दीन काझी (मंगळवेढा) आदींचा प्रामुख्याने सहभाग होता. पीर मंगळवेढा सवारीचे प्रमुख एजाजहुसेन मुजावर यांनी स्वागत केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा