*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
महाशिवरात्री यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट शंकरनगर यांच्यावतीने ट्रस्टचे अध्यक्ष व ग्रामीण संस्कृतीचे जोपासक जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. २८ व मंगळवार दि. २९ जूलै २०२५ रोजी शंकरनगर येथील शिवपार्वती मंदिर परिसरात सायंकाळी ४ ते ८ या वेळेत महीलां साठी पारंपारीक खेळ, नागपंचमी सण सोहळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजिका कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी दिली.
शंकरनगर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी समितीचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, सौ. ऋतुजादेवी मोहिते पाटील, कु. कृष्णप्रिया मोहिते पाटील प्रमुख उपस्थित होते.
कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या, टीव्ही. मोबाईल याच्या पलीकडे जाऊन महिलांना पारंपारिक खेळाचा मनमुराद आनंद मिळावा, आपली संस्कृती जोपासावी या साठी सदरच्या सोहळ्याचे आयोजन केले आहे. यामध्ये नागपंचमीचा झोका, फेर, फुगडी,झिम्मा, पिंगा, काठवठकणा या सह विवीध पारंपारिक खेळांचा समावेश आहे. गतवर्षी शिवपार्वती मंदिर परिसरात श्रावणी सोहळ्याचे आयोजन केले होते. यामध्ये सुमारे १० ते १२ हजार महिलांनी,मुलींनी पारंपारिक वेशभूषेत सहभागी होऊन पारंपारिक खेळाचा मनमुराद आनंद लुटला होता. यावर्षी मात्र मोठ्या प्रमाणावर हा सोहळा साजरा होत आहे.
याकरिता मंदिर परिसरात २५ हजार स्क्वेअर फुटाचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत असून यामध्ये सुमारे १५ हजार महिलांना पारंपारिक खेळ खेळता येणार आहेत.येथून पुढे दरवर्षी नागपंचमी सणानिमित्त हा सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांचेही सहकार्य असल्याचे स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी सांगितले.
कु. कृष्णप्रिया मोहिते पाटील म्हणाल्या, फुगडी, झोका, फेर आदी पारंपारिक खेळ आधुनिक तंत्रज्ञानामुळे लोप पावत चालले असताना शंकरनगर येथे आयोजित होत असलेल्या या सोहळ्यामुळे मोठ्या शहरात शिकणाऱ्या मुलींनाही महाराष्ट्राची परंपरा व संस्कृती माहिती होऊ लागली आहे. महिलांसाठी ही आनंदाची पर्वनीच आहे . या मध्ये सर्व समाजातील महिलांचा सहभाग ही कौतुकास्पद आहे.
सोबत फोटो.. फोटो ओळी...
शंकरनगर येथे साजरा होणाऱ्या महिलांच्या नागपंचमी सण व पारंपारिक खेळ सोहळ्याची माहिती देताना कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील,सौ. ऋतुजादेवी मोहिते पाटील, कु. कृष्णप्रिया मोहिते पाटील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा