उपसंपादक- नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
साहित्यिक सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हाजी मोहम्मद ईसाक फराश फाउंडेशन तर्फे 2025 जीवनगौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार ,जेष्ठ विधी तज्ञ ॲड.वाजिद खान,फैज मॅटर मनीचे इंतेखाब फराश इत्यादी मान्यवरांचे हस्ते
दौंड येथील लेखिका कवियित्री अनिसा सिकंदर शेख यांना जीवन गौरव देऊन सन्मान करण्यात येणार आहे. हा सोहळा शनिवार दिनांक 19/7/2025 रोजी YMCA कॉटर गेट पुणे येथे होणार आहे.
अनिसा सिकंदर शेख या ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या सहसचिव आहेत त्या नवलेखकांना लेखनासाठी प्रोत्साहित करतात व मार्गदर्शन करतात . त्याच्या संकल्पनेतून संस्थेमार्फत दरवर्षी फातिमाबी शेख यांच्या नावे वेगवेगळ्या जिल्ह्यात साहित्य संमेलन घेतात.या कार्यामुळे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांच्या कार्यास उजाळा मिळाला. अनिसा सिकंदर यांनी २०२२ मध्ये फातिमाबी यांच्या कार्यावर आधारित प्रतिनिधीक काव्य संग्रहाचे संपादन केले. त्या 'स्पंदन' बहुभाषीय त्रैमासिकाच्या उपसंपादिका आहेत. हिंदी मराठी इंग्रजी उर्दू या भाषेत लिहिणाऱ्या कवी लेखकांना ते व्यासपीठ उपलब्ध करून देतात तसेच त्या 'इख़्लास' रमजान अंकाच्या संपादिका आहेत. इस्लाम धर्मातील माहिती या अंकाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवतात. या अंकद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्याचे आव्हान करतात. अनिसा सिकंदर यांची एकूण चार पुस्तक प्रकशीत आहेत. त्यांच्या हिंदी काव्यसंग्रह 'काव्यपथिक' साठी महाराष्ट्र शासनातर्फे अनुदान प्राप्त आहे.त्यांची जीवनगौरव या उच्च सन्मानासाठी निवड झाल्यामुळे साहित्य क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा