Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ११ जुलै, २०२५

*अल्पसंख्यांक समाजाचा विकास फक्त काँग्रेसच करू शकतो, मतविभागणी रोखा, महानगरपालिकेत काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा...* *....अल्पसंख्यांक विभागाच्या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांचे आवाहन*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली, सोलापूर शहर काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष जुबेर कुरेशी यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक आयोजित केली होती. ही बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीतील प्रभाग निवडणूक निहाय रणनीती, अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न आणि त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व, जनसंपर्क, शिक्षण, रोजगार आदी मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.


या बैठकीत आरिफ शेख शकील मौलवी, कोमोरो सय्यद, इलियास शेख, शफी हुंडेकरी आदींनी आपले विचार व्यक्त केले.


यावेळी बोलताना सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे म्हणाले की, गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेस पक्षाने अल्पसंख्याक समाजाला संविधानिक अधिकार, समान संधी, सुरक्षितता, हक्क, शिक्षण, रोजगार, राजकीय प्रतिनिधित्व उपलब्ध करून दिले आहे. यापुढेही देत राहील. सध्याच्या राजकीय परिस्थितीत काही शक्ती जाणूनबुजून अल्पसंख्यांक मतांचे विभाजन करून त्यांच्या हक्कांवर गदा आणू पाहत आहेत, असे स्पष्ट करत मतविभागणी रोखून सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त काँग्रेसचे नगरसेवक निवडून आणा असे आवाहन केले

पुढे बोलताना नरोटे म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असून सर्व धर्म, जाती-पंथांना समान न्याय देण्याची काँग्रेसची परंपरा कायम राहील अशी ग्वाहीही त्यांनी दिली.


तसेच यावेळी सोलापूर शहर काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष जुबेर कुरेशी यांनी सांगितले की, अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने प्रभाग निहाय रणनीती ठरवून जनसंपर्क मोहिम राबविण्यात येणार आहे. भाजप सत्तेत आल्यापासून अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल जनजागृती करून आगामी महानगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील राहणार आहे.



या बैठकीस सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, सोलापूर शहर काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष जुबेर कुरेशी, माजी महापौर आरिफ शेख, मा. नगरसेवक रियाज हुंडेकरी, फिरदौस पटेल, प्रदेश सरचिटणीस शकील मौलवी, वाहिद नदाफ, हारून शेख, कोमोरो सय्यद, मैनुद्दीन शेख, मैनुद्दीन हत्तुरे, शोहेब महागामी, इलियास शेख, सोहेल कुरेशी, सैफन शेख, रुस्तुम कंपली, शफी हुंडेकरी, नूर अहमद नालवार, लतिफ शेख, रफिक चकोले, सलीम नदाफ, रजाक कादरी, याकूब मंगलगिरी, सोहेल पठाण, बशीद इंगळगी,शकील बिल्डर शेख, मुन्ना बेलीफ, नासिर पठाण, भैय्या दफेदार, जावेद कुरेशी, अशफाक बेलीफ, रजाक मालक, मुर्तुज काझी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा