Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्याचा महोत्सव देशभक्तीच्या रंगात रंगला तिरंगा सोहळा

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्यूज मराठी

फिनिक्स इंग्लिश स्कूलचा परिसर आज सकाळी देशभक्तीच्या रंगांनी उजळून निघाला. पहाटेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि पालकांमध्ये उत्साहाची लहर होती. नॉन कमिशन ऑफिसर विकास जगदाळे यांच्या हस्ते अभिमानाने तिरंगा फडकवण्यात आला, राष्ट्रसेवेतील त्यांचे हे १४ वे वर्ष आहे ,त्यांचे अद्वितीय योगदान शौर्य सेवाभाव पाहता उपस्थित पालक व विद्यार्थी यांनी त्यांचे उभे राहून स्वागत केले जवान विकास जगदाळे यांचा पराक्रम हा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यध्यापिका नूरजहाँ शेख यांनी केला.ध्वजारोहन होताच राष्ट्रगीताच्या गजराने वातावरण भारून गेले.माजी सैनिक मनोहर भोळे वीरपत्नी सोनाली सौरभ फराडे ,रेश्मा विकास जगदाळे यांच्या उपस्थितीत शाळेचे वातावरण उत्साहमय व देशभक्तीपूर्ण झाले .

विद्यार्थ्यांच्या सुरेल आवाजातली देशभक्तीपर गाणी, नृत्यावरील दमदार ताल आणि चिमुकल्या विध्यर्थ्यांची भाषणे पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा वर्षाव केला. देशासाठी हसत-हसत बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन करण्यात आले.






शाळेच्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख यांनी "देशप्रेम हे फक्त भावना नाही, ती कृती असते" असा संदेश दिला. शेवटी ‘भारत माता की जय’ च्या घोषणांनी आकाश दणाणून गेले आणि तिरंग्याखाली एकत्र आलेल्या सर्वांच्या मनात अभिमानाचा ज्योत पेटली.या प्रसंगी ऍड.प्रदीप कदम ,अभिजित जाधव सर , पालक संघाचे अध्यक्ष महादेव कोळेकर उपाध्यक्ष निलेश वाघ,महिला पालक संघ अध्यक्षा निशा ननवरे ,उपाध्यक्षा निकिता मोरे,गुलशन शेख, तमन्ना शेख व पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला ,खाऊ वाटप केलेल्या पालकांचे व उपस्थितांचे आभार गुलशन शेख यांनी मानले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा