Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ११ ऑगस्ट, २०२५

मसाप पुरस्काराने इंद्रजीत पाटील सन्मानित

 


बार्शी तालुक्यातील रूई गावचे सुप्रसिद्ध साहित्यिक इंद्रजीत पाटील यांचा मसाप शाखा,भाेसरी तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गाैरव करण्यात आला.ज्येष्ठ साहित्यिक लाेककवी विठ्ठल वाघ सर,सुप्रसिद्ध कवी भरत दाैंडकर सर,भाेसरी मसाप शाखा अध्यक्ष मुरलीधर साठे,प्रशांत शर्मा,दिनकर मुंडे सर,प्रा.दिगंबर ढाेकले सर या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित हा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला.सागर भाेसले यांनी प्रतिनिधी म्हणून हा पुरस्कार स्वीकारला.सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप हाेते.हा साेहळा श्री. विठ्ठल सभागृह,भाेसरी,पुणे-३९ याठिकाणी पार पडला.साहित्यिक इंद्रजीत पाटील यांना यावर्षीचा हा तेविसावा राज्यस्तरीय पुरस्कार असून त्यांच्या साहित्यिक कामगिरीचे सर्वत्र कौतुक हाेत आहे.पंडित लाेहाेकरे,प्रकाश संकुडे गुरूजी,चंद्रकांत पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,जीवराज गरड यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा