*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
----- शेतकऱ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून शेती करावी. तसेच मातीचे आरोग्य, सिंचन व्यवस्थापन व सेंद्रिय घटकांचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेती गरजेचे असल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ शास्त्रज्ञ महेश जाधव व ऋषिकेश कदम यांनी शेती पाहणीवेळी केले.
गणेशवाडी येथील प्रगतिशील बागायतदार विकास शिंदे यांच्या केळीच्या प्लॉटला बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ महेश जाधव व ऋषिकेश कदम यांनी भेट दिली. यावेळी शिशुपाल शिंदे, अशोक मगर, युवराज शिंदे, रणजित शिंदे आदि शेतकरी उपस्थित होते.
या प्लाॅटच्या पाहणी दरम्यान त्यांनी केळी उत्पादनाची पद्धत, शास्त्रशुद्ध लागवड, खत व्यवस्थापन तसेच रोग व कीड व्यवस्थापन याची माहिती विकास शिंदे यांच्या कडून घेतली. विकास शिंदे यांनी त्यांच्या प्लॉटमध्ये केळीची जैन G 9 या जातीची लागवड केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्कृष्ट उत्पादन घेण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यांचा प्लॉट हा परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे.
कृषी शास्त्रज्ञांनी प्लॉटचा सविस्तर आढावा घेत, केळीच्या वाढीचा टप्पा, मातीचे आरोग्य, सिंचन व्यवस्थापन तसेच सेंद्रिय घटकांचा वापर यावर मार्गदर्शन केले. त्यांनी विकास शिंदे यांच्या कामाचे कौतुक करत, इतर शेतकऱ्यांनी देखील अशाच प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोनातून शेती करावी, असे आवाहन केले.
या प्रसंगी परिसरातील शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी शास्त्रज्ञांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला आणि मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
फोटो - गणेशवाडी येथील प्रगतिशील बागायतदार विकास शिंदे यांच्या केळी प्लाॅटची पाहणी करताना शास्त्रज्ञ.
---------------------------






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा