इंदापूर तालुका प्रतिनिधी डॉ. संदेश शहा, मोबाईल नंबर 9922419159
-----इंदापूर बेडसिंग रोड येथील आरोग्यम योग निसर्गोपचार ॲक्युपंक्चर केंद्राचे उद्घाटन युवकमित्र गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सुविद्य पत्नी सौ. सारिका भरणे, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे व कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष तथा उद्योजक भरतशेठ शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. योग रत्न योगाचार्य विजय नवल पाटील व डॉ. सुवर्णा नवल पाटील हे केंद्र संचालक म्हणून काम पाहणार आहेत.
यावेळी बंडातात्या कराडकर म्हणाले, शरीर निरोगी राहण्या साठी दिनचर्या, आहार चर्या, ऋतुचर्या तसेच आयुर्वेदाच्या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. आयुर्वेदिक दिनचर्या ही सुखी जीवनाची आदर्श गुरुकिल्ली असून इंदापूर तालुक्यात गलांडवाडी न १, व २ गावात असे चार केंद्र सुरू आहेत याचा सार्थ अभिमान आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग निसर्गोपचार ॲक्युपंक्चर व आयुर्वेदाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ कीर्तनकार ह भ प बंडातात्या कराडकर यांनी केले.
“योग, निसर्गोपचार ॲक्युपंक्चर आयुर्वेद, या माध्यमातून औषधमुक्त जीवन व नैसर्गिक आरोग्याची नवी दिशा समाजाला देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कोरोना महामारी नंतर जग पुन्हा आयुर्वेदा कडे मोठ्या आशेने पहात आहे असा विश्वास सौ. सारिका भरणे यांनी यावेळी व्यक्त केला.
या केंद्राच्या माध्यमातून योग, ध्यान,निसर्गोपचार व ॲक्युपंक्चरचे विविध उपक्रम राबवून आरोग्य दायी जीवनशैलीचा प्रसार केला जाईल.
औषधांवर अवलंबून न राहता निसर्गाशी सुसंगत जीवन जगणे हीच खरी आरोग्यसंपदा आहे, असा विश्वास केंद्र संचालक योगाचार्य विजय नवल पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी इंदापूर तालुक्या तील व्यसनमुक्त युवक संघ, आर्ट ऑफ लिविंग, युवा क्रांती प्रतिष्ठान, पतंजली योग समिती, वृक्ष संजीवनी परिवार, ज्येष्ठ नागरिक संघ, इंदापूर सायकल क्लब, छत्रपती शिवाजी मित्र मंडळ, जय हिंद आजी-माजी सैनिक संघ, व्यापारी संघटना, पत्रकार संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष नरुटे व विजयकुमार फलफले सर यांनी केले. प्रा. धनंजय देशमुख यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा