*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त व सद्भावना दिनानिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांनी संसद भवनातील सेंट्रल हॉल येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
स्व. राजीव गांधी हे भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून देशाच्या कारभाराची धुरा सांभाळणारे दूरदर्शी नेते होते. माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली. पंचायतीराज व्यवस्थेद्वारे ग्रामपातळीवर लोकशाही बळकट करण्याचे कार्य त्यांनी केले. आधुनिक भारताची उभारणी आणि विकासाचा पाया मजबूत करण्याचे योगदान त्यांचे मोलाचे ठरले.
सद्भावना, प्रगतीशील विचारसरणी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांनी दिलेले योगदान भारतीय राजकारणात सदैव स्मरणीय राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा