Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २० ऑगस्ट, २०२५

इंदापूर येथील मोहम्मद उमर समीर शेख याची अमेरिकेतील नासा येथे अंतराळ संशोधन संस्था भेटी साठी निवड.

 


इंदापूर तालुका प्रतिनिधी डॉ. संदेश शहा, मोबाईल नंबर 9922419159

-----इंदापूर येथील मोहम्मदउमर समीर शेख या एकमेव विद्यार्थ्याची अमेरिके तील नासा येथे अंतराळ संशोधन संस्था भेटी साठी निवड झाल्याने त्याचे कौतुक होत आहे. 

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आंतर विद्यापीठ खगोल शास्त्र व खगोल भौतिकशास्त्र केंद्र (नासा) आणि भारतीय अंतराळ संस्था, इस्रो या प्रतिष्ठित संस्थांना भेटीची संधी मिळावी यासाठी तीन टप्प्यांत चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. या उपक्रमासाठी आयुकाच्या मार्गदर्शना खाली अभ्यासक्रम तयार करण्यात आला होता. हा उपक्रम विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्रातील करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाचा आहे. एकूण १६ हजार १२१ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. १३ हजार ६७१ विद्यार्थ्यांनी पहिली परीक्षा दिली. एक हजार ५४१ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. मुलाखतीसाठी २३५ विद्यार्थी पात्र ठरले. ७५ विद्यार्थी नासा व इस्रोला जाण्यासाठी पात्र ठरले. यापैकी २५ विद्यार्थ्यांची नासासाठी व ५० विद्यार्थ्यांची इस्रोला जाण्यासाठी निवड करण्यात आली आहे.

इंदापूर तालुक्यातील ४७२ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. ऑनलाईन परीक्षेसाठी ४९ तर तिसऱ्या टप्प्यात मुलाखतीसाठी १२ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. जिल्हा परिषद शाळा शहा, इंदापूर येथील मोहम्मदउमर समीर शेख हा सहावीत शिकणारा विद्यार्थी आहे. मोहम्मदउमर समीर शेख याची अंतराळ संशोधन क्षेत्रातील आवड ओळखून त्याची आत्या रूकसाना शेख यांनी त्यास प्रोत्साहन दिले. इंदापूर तालुक्यातून नासा साठी निवड झालेला तो एकमेव विद्यार्थी ठरला आहे. शहरातील ज्येष्ठ मार्गदर्शक युसूफ शेख हे त्याचे आजोबा तर इरफान शेख यांचा तो पुतण्या आहे. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, नगरपरिषदेतील माजी गटनेते कैलास कदम यांच्यासह सर्वांनी त्याचे कौतुक केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा