इंदापूर तालुका प्रतिनिधी डॉ. संदेश शहा, मोबाईल नंबर 9922419159
-----इंदापूर पोलीस ठाण्या समोरील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात भरतशेठ शहा मित्र परिवाराने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सव स्पर्धेत इंदापूर येथील महात्मा फुले दहीहंडी गोविंदा पथकाने दहिहंडी फोडत ५१ हजाराचे पारितोषिक जिंकले. तरुणाईची अलोट गर्दी, चोहोबाजूंनी मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद, महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, गोविंदांच्या सुरक्षितते साठी घेण्यात आलेली विशेष खबरदारी हे कार्यक्रमाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमा तील कलाकार प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, रोहित माने, वनिता खरात व सिनेतारका, नृत्यांगना मीरा जोशी यांचे सादरीकरण यामुळे सुमारे पाच तासांहून अधिक काळ हा कार्यक्रम रंगला. यावेळी कलाकारांच्या नृत्यावर उपस्थितांनी देखील ठेका धरल्याने कार्यक्रमाची गोडी वाढली.
कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, माजी संचालक मुकुंद शहा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, देवराज जाधव, महारुद्र पाटील, माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा, वैशाली भरत शहा, रुचिरा अंगद शहा, अरविंद वाघ, शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त अंगद शहा, गणेश महाजन, सुनील तळेकर, अमर गाडे, गजानन गवळी, अतुल शेटे, प्रमोद राऊत, रघुनाथ राऊत, डॉ. श्रेणिक शहा, डॉ. संजय शहा, संजय दोशी, रोटरी क्लब चे अध्यक्ष नितीन शहा, उदय शहा,
धरमचंद लोढा, गोरख शिंदे, बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, संचालक वसंत मोहोळकर व दत्तात्रय फडतरे, सुनील अरगडे, विनोद बाब्रस, आरशद सय्यद, बंडा चव्हाण, अमोल शहा, पोपटराव पवार, अतुल व्यवहारे, अमोल माने, अक्षय सूर्यवंशी, उमेश ढावरे, मनोज राजगुरू यांच्या उपस्थितीत सोमवारी दि.१८ रोजी सायंकाळी सात वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आबालवृद्धांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली दहीहंडी स्पर्धा सुरु झाली.
सुरवातीस व्यंकटेश दहीहंडी गोविंदा पथकाने सात थरांची यशस्वी सलामी दिली. नंतर स्वराज्य दहीहंडी गोविंदा पथकाने सात थर उभारत वरच्या तिसऱ्या थरावर असणाऱ्या गोविंदाने तीन बैठका मारत प्रेक्षकांची दाद मिळवली. त्यानंतर शिव शंभो व तिरंगा दहीहंडी संघाच्या पथकांनी सात थरांचा अयशस्वी प्रयत्न केला तर मालोजी राजे दहीहंडी गोविंदा पथकाने पाच थरांची यशस्वी सलामी दिली. महात्मा फुले दहीहंडी गोविंदा पथकाने आठ थरांचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश मिळाले नाही.
त्यानंतर दहीहंडी पाच फूट खाली घेण्यात आल्यानंतर सर्व गोविंदा पथकांच्या प्रमुख सदस्यांच्या उपस्थितीत चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्यामध्ये पहिलीच चिठ्ठी निघालेल्या महात्मा फुले दहीहंडी गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात सहा थर उभारून दहीहंडी फोडत भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या चषकावर आपले नाव कोरत ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस पटकावले.
यंदाच्या वर्षी दहीहंडी स्पर्धेसाठी तब्बल १ लाख ३१ हजार रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली होती. तालुक्यातील सात नामांकित दहीहंडी गोविंदा पथकांना स्पर्धेचे निमंत्रण देण्यात आले होते. प्रत्येक पथकाला स्वागतमूल्य म्हणून ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. शेवटच्या गोविंदासाठी सेफ्टी बेल्टसह स्वतंत्र ट्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमासाठी उपस्थित नेते, प्रमुख कार्यकर्ते पहाता भरत शहा यांच्या नेतृत्वावर नवीन राजकीय समीकरण तयार झाल्याचे शिक्कामोर्तब दिसून आले. कार्यक्रम खूप आनंदी वातावरणात पार पडल्याने संयोजकांचे कौतुक होत आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा