Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

*तरंगवाडी तलावात तात्काळ पाणी सोडून तलाव भरून द्यावा-- भैरवनाथ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष- नितीन गोफणे यांची उपमुख्यमंत्री ,अजितदादा पवार व कृषी मंत्री, दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे मागणी*

 


*इंदापूर तालुका ---प्रतिनिधी*

 *डॉ.संदेश शहा*

 *मो:-9921 419 159

इंदापूर शहरानजीक असलेला तरंगवाडी तलाव हा संपूर्ण पाण्याने भरून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी गोखळी येथील भैरवनाथ सहकारी पाणी वापर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन गोफणे यांनी केली आहे. तर उजनी धरणातील प्रदूषित पाण्याऐवजी तरंगवाडी तलावाची उंची, खोली व व्यास वाढवून इंदापूरकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी माजी नगराध्यक्षा सौ. अलका ताटे व माजी उपनगराध्यक्ष कृष्णा ताटे यांनी शासनाकडे केली आहे.

तरंगवाडी तलाव हा ६७ एमसीएफटी पाणी साठवण क्षमता असणारा तलाव असून या तलावावर गोखळी, तरंगवाडी, झगडेवाडी, विठ्ठलवाडी, वडापुरी, इंदापूर, येथील शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे. या तलावातून १०५ शेतकऱ्यांच्या पाणी वापर परवानग्या आहेत तर या तलावावर इंदापूर नगरपालिका, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, विद्या प्रतिष्ठान, इंदापूर दूधगंगा व सोनाई दूध डेरी या देखील संस्थांना पाणी दिले जाते. मात्र या तलावात नियमित पाणी येत नसल्याने हा तलाव पाण्यासाठी पावसाळ्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पाणी पुरत नसल्याने इंदापूर नगरपालिकेने उजनी धरण पाणलोट क्षेत्रातून शहरास पाणी पुरविण्यास सुरुवात केली. मात्र हे पाणी दूषित असल्याने शहर व उजनी पाणलोट क्षेत्रात कॅन्सर, मधुमेह, थायरॉईड, सोरायसिस, किडनीचे विविध विकार होण्यास मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे. त्यामुळे उजनी धरणाऐवजी तरंगवाडी तलावातून शहरास शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी नागरी संघर्ष समितीचे संस्थापक प्रा. कृष्णा ताटे यांनी केली आहे. इतर संस्था प्रमुखांनी आपापल्या पद्धतीने पाण्याची सोय केलेली आहे, त्यामुळे या तलावाकडे गांभीर्याने पहिले जात नाही तसेच या तलावातून गोखळी, तरंगवाडी, विठ्ठलवाडी, झगडेवाडी या चारही गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत. पंचक्रोशीतील ३०० एकर हून जास्त शेतकऱ्यांचे अर्थकारण या पाण्यावर अवलंबून आहे. पुणे जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकावर असणारा हा तरंगवाडी तलाव आहे. या तलावात निरा डावा कालवा तसेच मुळा मुठा म्हणजे खडकवासला कालवा या दोन्ही कालव्यातून पाणी सोडता येते व तलाव भरला जातो. मात्र अद्याप पर्यंत या तलावात पाणी आलेले नसून मे मध्ये जो पाऊस झाला त्या पावसामुळे तलावात काहीशा प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे ऊस, मका, कडवळ, डाळिंब, केळीच्या बागा व इतर पिके आज जीवंत दिसत आहे. परंतु तलावातील पाणीसाठा अत्यंत कमी असून येणाऱ्या दिवसात तलावात पाणी नाही आले तर हातातोंडाशी आलेली पिके जळून जातील. कारण शेतकरी गेल्या दोन महिन्या पासून पावसाच्या प्रतीक्षेत आहे. विशेष म्हणजे वीर, भाटघर आणि खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने मुळा मुठा कालवा म्हणजे खडकवासला कॅनॉल किंवा निरा डावा कालवा या दोन्ही कालव्यातून तरंगवाडी तलावात पाणी सोडून तरंगवाडी तलाव हा पूर्ण क्षमतेने भरून मिळावा अशी मागणी भारत वाघमोडे, माजी सरपंच बापू पोळ, सरपंच गोखळी अनिल चितळकर, सामाजिक कार्यकर्ते राजू मकर, तरंगवाडीचे सरपंच आप्पा शिंदे, झगडेवाडी गावचे सरपंच व इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, गलांडवाडी विठ्ठलवाडीचे सरपंच दिलीप भोंग, उपसरपंच सुहास बोराटे, नवनाथ डाके, आजिनाथ ठोंबरे, संदिपान पोळ, औदुंबर वाघमोडे, सुरेश वाघमोडे, बलभीम वाघमोडे, बाळू मकर, नवनाथ गोफणे तसेच चारीही गावातील शेतकऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच राज्याचे कृषी मंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. या

तलावातील पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी तलावातील गाळ काढण्यासंदर्भात मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली मात्र तलावात थोडे पाणी असल्याने गाळ काढता आला नसल्याची माहिती भैरवनाथ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन गोफणे यांनी शेवटी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा