*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
मंगळवेढा --मातृभूमी धोक्यात आहे. मत चोरणाऱ्यांपासून तिचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. हे कार्य महिलांनी पुढे येऊन करणे आवश्यक आहे. कारण जिजाऊ आणि सावित्रीबाई यांनी ज्या पद्धतीने कार्य केले, त्याच धर्तीवर आज महिलांमधील जिजाऊ–सावित्री जाग्या झाल्या पाहिजेत, असे प्रतिपादन खासदार प्रणितीताई शिंदे यांनी मंगळवेढा येथे बोलताना केले.
श्रावण मास व गोपाळकाला निमित्त रामलिंग मंदिरात खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पुढे बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या मंगळवेढेकरांनी लोकसभेत भरभरून मतदान करून पाठिंबा दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि “मंगळवेढेकरांच्या सोबत नेहमी खंबीरपणे राहू” असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, प्रणिताताई भालके, प्रदेश सचिव रविकिरण कोळेकर, मनोज यलगुलवार, मतदारसंघाध्यक्ष मारुतीबापू वाकडे, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, शहराध्यक्ष ॲड. राहुल घुले, राहुल वाकडे, संदीप फडतरे, मुरलीधर घुले, गणेश धोत्रे, मनोज माळी, नाथा ऐवळे, आयेशा शेख, सुनिता अवघडे, नागनाथ राजमाने, गजानन देशमुख, विनोद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा