*अकलूज --प्रतिनिधी*
*शकूरभाई. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशालेत सालाबाद प्रमाणे याही वर्षी राखी तयार करणे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .प्रशालेतील विद्यार्थिनींनी सोबत आणलेल्या वेगवेगळ्या रंगीबेरंगी मनी ,पेपर ,राखी सजावटीसाठी लागणारे वेगवेगळ्या साहित्याचा वापर करून आपल्या कल्पकतेनुसार छान छान राख्या तयार केल्या.आपण स्वतः तयार केलेल्या राख्या देशाचे रक्षण करणारे सैनिक हातामध्ये बांधणार या गोष्टीचा आनंद झाल्याचा भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या .राख्या तयार करणे कार्यशाळेतून विद्यार्थिनींना स्वतः नवनिर्मिती करण्याची,व्यवसायिक शिक्षण घेण्याची संधी मिळाली.विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या या मराठा रेजिमेंटच्या सैनिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छासह पाठवण्यात आल्या.कार्यशाळेस सहभागी सर्व विद्यार्थिनींचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता पवार मॅडम यांनी कौतुक केले.प्रशालेचे चित्रकला शिक्षक विशाल लिके यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा