*उपसंपादक -नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
रक्षाबंधन हा सण फक्त भावाबहिणीच्या नात्याचा उत्सव नसून, तो संरक्षण, आपुलकी आणि नातेसंबंधातील बंध दृढ करण्याचा दिवस आहे. याच भावनेतून फिनिक्स स्कूलच्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख यांनी गावात सुट्टीसाठी आलेल्या सैन्यातील जवान विकास हनुमंत जगदाळे यांना राखी बांधून बंधुत्वाचा आणि राष्ट्रीय एकतेचा अनोखा संदेश दिला.
या प्रसंगी नूरजहाँ शेख म्हणाल्या, “आपल्या सीमांवर दिवस-रात्र जागून देशाचे रक्षण करणारे जवान हे आपले खरे बंधू आहेत. त्याग, शौर्य आणि सेवाभावामुळेच आपण सुरक्षित आहोत. धर्म किंवा जातीपेक्षा मानवी मूल्यं आणि देशभक्ती हीच खरी ओळख आहे.”
जवानाने सांगितले की, “जनते चे हे प्रेम आणि विश्वासच आमची खरी ताकद आहे. अशा प्रेमळ भावनेमुळे देशसेवेसाठी प्रेरणा अधिक दृढ होते.”
स्थानिक ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत करत याला धार्मिक सलोखा, सामाजिक ऐक्य आणि देशभक्तीचे प्रेरणादायी उदाहरण म्हटले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा