*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
----- बावडा ग्रामपंचायत कडून सन २०१८ पासून निर्माण केलेल्या दलित वस्त्या व त्यांना मिळालेल्या शासकीय निधी तसेच बावडा गावातील पाणंद रस्ते कामात तत्कालीन सरपंच किरण पाटील, विद्यमान सरपंच पल्लवी गिरमे व ग्रामविकास अधिकारी अंबिका पावसे यांच्या गैरकारभाराची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अश्वजित कांबळे यांनी कार्यालयासमोर शासकीय वेळेत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, बावडा ग्रामपंचायत कार्यालयाकडून सन २०१८ ते सन २०२५ वर्षांपर्यंत ३२ दलित वस्त्या दाखवण्यात आले आहेत. त्या करीता ग्रामविकास मंत्रालयाकडून मिळालेल्या दलित वस्त्यांच्या निधीत मोठ्या प्रमाणात गैरकारभार व अपहार झाला आहे.
तत्कालीन सरपंच किरण पाटील, विद्यमान सरपंच पल्लवी गिरमे व ग्रामविकास अधिकारी अंबिका पावसे यांनी शासनाचा आलेला दलित वस्त्यांचा निधी अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजात खर्च करण्याचे शासनाचे आदेश असताना सदरचा निधी सन २०१८ पासून ते सन २०२५ पर्यंत चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीररीत्या इतर वार्डात वापर केला आहे. त्याबाबत अनेकदा ग्रामसभेत लेखी अर्ज देऊनही दलित वस्त्या निधीबाबत विचारणा केली असता त्यावर कुठलीही सत्वर कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. तसेच ग्रामसभेत यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना ग्रामविकास अधिकारी अंबिका पावसे उडवा उडवीचे उत्तरे देत आहेत.
तत्कालीन सरपंच किरण पाटील, विद्यमान सरपंच पल्लवी गिरमे व ग्रामविकास अधिकारी अंबिका पावसे यांनी दलित वस्त्या निधीचा गैरप्रकारे इतर वार्डात खर्च केल्याचे आढळून येत आहे. शासनाच्या अटी व शर्तीस छेद देवून अनिर्बंध विशेष अधिकार वापरून संगनमताने निधीचा गैरकारभार केला आहे. तसेच सन २०१८ पासून आजतागायत बावडा ग्रामपंचायत कडून दलित वस्त्या व इतर कामांची चालू व पुर्ण झालेल्या कामांची काढलेली बिले व इंदापूर पंचायत समितीला कळविलेल्या निर्धारण अहवालाची संपुर्ण गैरकारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनात आहे.
त्यांच्या विरुद्ध १५ ऑगस्ट २०२५ पासून बावडा ग्रामपंचायत कार्यालयासमोर शासकीय वेळेत बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सदर आंदोलनास महादेव घाडगे, पंडीत पाटील, अनिल कांबळे, समाधान कांबळे, विशाल कांबळे, पांडुरंग गायकवाड, गोरख गायकवाड आदिंनी भेट देवून पाठींबा दिला आहे.
सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय मंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, उपविभागीय दंडाधिकारी, अप्पर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, तालुका दंडाधिकारी, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत.
यासंदर्भात विद्यमान सरपंच पल्लवी गिरमे व तत्कालीन सरपंच किरण पाटील यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. तर ग्रामविकास अधिकारी अंबिका पावसे म्हणाल्या शासनाच्या अटी व शर्तीस अधिन राहुनच दलित वस्त्यांचे निर्माण व निधीचा विनियोग व वापर केलेला आहे.
फोटो - बावडा ग्रामपंचायत कार्यालयासमोर अश्वजित कांबळे यांचे सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा