Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

पूरग्रस्त पंढरपूरकरांसाठी स्थलांतर व सोयी सुविधा उपलब्ध करून द्या खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी* *पंढरपूर मंगळवेढा मोहोळ तालुक्यात भीमा नदी काठ पोरी नियंत्रण कक्ष सजीव ठेवण्याची मागणी


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448

पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ तालुक्यामधील भीमा नदी काठावरील शहरी व ग्रामीण भागात पूर नियंत्रण कक्ष व संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या मार्फत मा. प्रांताधिकारी पंढरपूर सचिन इतापे यांना निवेदन देण्यात आले.



 या निवेदनाद्वारे खासदार प्रणिती शिंदे यांनी अशी मागणी केली की, सध्या उजनी व वीर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात येत आहे. यामुळे भीमा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून पूर परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे भीमा नदीकाठचा पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ तालुक्यामधील व पंढरपूर शहरातील सखल भागात पाणी शिरत आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावे लागणार आहे. स्थलांतरास लागणाऱ्या उपाययोजना आपल्या प्रशासनामार्फत तात्काळ करण्यात याव्यात. तसेच पूरग्रस्त नागरिकांची इतर सुरक्षित ठिकाणी राहण्याची सोय करून त्यांना इतर सोयी–सुविधा देण्याचे नियोजन करण्यात यावे, याकरिता आपली आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवून संबंधित यंत्रणांना तात्काळ आदेश देण्यात यावेत.


तसेच ग्रामीण भागातील भीमा नदीकाठच्या परिसरातील नागरिकांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करावे व त्या स्थलांतरित नागरिकांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यात यावेत, अशी मागणी केली


यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप पाटील, पंढरपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमर सूर्यवंशी, हणमंतू मोरे, अनिकेत देशमुख, विजयसिंह देशमुख, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, समाधान हाके, पद्मिनी शेट्टीयार आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा