*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा आ प्रशांतराव परिचारक मालक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कारखान्याकडून विविध समाज उपयोगी
कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबवणेत आले असून जागर माय मराठीचा हा गीत नृत्य यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन केले आहे.
त्याचप्रमाणे मा.आ.श्री प्रशांतराव परिचारक मालक यांचा वाढदिवसानिमित्त यथोचित सन्मान कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी व अधिकारी यांच्याकडून करण्यात आला होता.
कारखान्याने विविध आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये सांघिक खेळ, मैदानी खेळ व वैयक्तिक खेळाचे आयोजन केले असून सांघिक खेळामध्ये हॉलीबॉल रस्सीखेच, क्रिकेट इत्यादी खेळाचा समावेश असून वैयक्तिक खेळामध्ये बॅडमिंटन बुद्धिबळ या खेळाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मातोश्री वृद्धाश्रम तसेच मूकबधिर शाळा यांना स्नेहभोजन व आर्थिक मदत करून एक प्रकारे
मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक मालक यांचा वाढदिवस समाज उपयोगी कार्य करून साजरा केला आहे. त्याचबरोबर कारखान्याने जागर माय मराठीचा या कार्यक्रमाचेही आयोजन केले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली.
मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक मालक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी भवनमध्ये सांधिक मैदानी तसेच वैयक्तिक खेळाचे उद्घाटन कारखान्याचे शासकीय लेखापरीक्षक श्री. गौतम निकाळजे यांनी कारखान्याचे चेअरमन मा आ श्री प्रशांतराव परिचारक मालक यांच्या उपस्थितीत व कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी व अधिकाऱ्यांच्या समवेत करण्यात आले. यावेळी कारखान्याचे सर्व अधिकारी व खेळाडू आणि कर्मचारी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा