*उपसंपादक -नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
शौर्य, सेवाभाव आणि समर्पणाची भारतीय सैन्याकडून दखल.
माळशिरस तालुक्यातील तांबवे गावातील सुपुत्र विकास हनुमंत जगदाळे हे सध्या काश्मीर मध्ये कर्तव्य बजावत आहेत यांनी NCO नॉन कमिशन ऑफिसर पदासाठी नियुक्ती झाली . भारतीय सैन्यात आपल्या उत्कृष्ट कामगिरी, शौर्य आणि सेवाभावामुळे पदोन्नती मिळवली असून संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रमंडळी, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विकास जगदाळे यांनी सैन्यातील सेवाकाळात अनेक आव्हानात्मक मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. सीमारेषेवरील कठीण परिस्थितीतही त्यांनी धैर्य, नेतृत्व आणि समर्पणाचे उत्तम उदाहरण घालून दिले. त्यांच्या या कार्यकौशल्याची आणि निष्ठेची दखल घेत भारतीय सैन्याकडून त्यांना ही पदोन्नती देण्यात आली.त्याबद्दल फौजी फ्रेंड्स फॉरेव्हर ग्रुप तांबवे ,तसेच ग्रामस्थांनी सन्मान सोहळा आयोजित केला या सोहळयात सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले ,तसेच नौसेनेतील कॅप्टन सागर इनामदार इंजिनियर अमित दत्तू पवळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सन्मानित करण्यात आले. जी.प. शाळेत विध्यर्थ्याच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या ,विजेत्या विद्यार्थ्यांना १५ ऑगस्ट रोजी फौजी फ्रेंड्स सर्कल मार्फत आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत .
या प्रसंगी जवान जगदाळे म्हणाले, “सैन्याची सेवा ही केवळ नोकरी नसून आयुष्यभराचं व्रत आहे. पदोन्नती ही केवळ माझ्यासाठी नाही, तर माझ्या गावासाठी, कुटुंबासाठी आणि त्या सर्वांसाठी आहे ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. सीमेवर उभं राहणं म्हणजे स्वतःसाठी नव्हे, तर लाखो देशवासीयांच्या स्वप्नांसाठी लढणं. माझ्या तांबवे गावातील प्रत्येक तरुणाने देशासाठी काही ना काही योगदान द्यावं, हीच माझी इच्छा आहे.”
गावकऱ्यांनी या यशाचा आनंद व्यक्त करत सांगितले की, विकास जगदाळे हे तांबवे गावाचा खरा अभिमान आहेत. त्यांच्या परिश्रम, शिस्त आणि देशभक्तीमुळे तरुणांना देशसेवेची प्रेरणा मिळेल.”
सयाजीराजे मोहिते पाटील तसेच ऍड प्रमोद कुलकर्णी यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड .प्रदीप कदम यांनी केले तर प्रस्तावना अभिजित जाधव यानी केली ,उपस्थितांचे आभार महादेव कोळेकर यानी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा