Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १६ ऑगस्ट, २०२५

इंदापूर अकलूज मार्गावरील बावडा येथील भांडगाव चौक ते शाहु महाराज चौक दरम्यान वर्दळीच्या ठिकाणी गतीरोधक बसवावेत. तसेच ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करून अपघात कमी करण्याची मागणी

 


कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147

----- इंदापूर अकलूज मार्गावरील बावडा येथील भांडगाव चौक ते शाहु महाराज चौक दरम्यान वर्दळीच्या ठिकाणी गतीरोधक बसवावेत. तसेच ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करून अपघात कमी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विशाल कांबळे व अश्वजित कांबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. कार्यवाही केली नाही तर धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

     सार्वजनिक बांधकाम विभागास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बावडा गावातून इंदापूर अकलूज मार्गावरून हलक्या व अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. भांडगाव चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान चौक ते शाहु महाराज चौक दरम्यान वर्दळ मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच भांडगाव चौकात श्री शिवाजी विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांचीही वर्दळ मोठी आहे. या दरम्यान शेकडो लहान मोठे अपघात झाले असून एका विद्यार्थीनीसह पाच जणांना जिव गमवावा लागला आहे.

    नरसिंहपूर बाजूकडून माती, मुरूम, वाळू, खडी आदि गौण खनिजाची ओव्हरलोड वाहतूक बिगर नंबरच्या डंपर, हायवा टिपर मधून रात्रंदिवस नियम पायदळी तुडवत मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. बारामती येथे घडलेल्या अपघातानंतर बारामती शहर वाहतूक पोलिसांनी वाहनांवर कारवाई केली. त्याच धर्तीवर बावडा परीसर व इंदापूर तालुक्यात करणे आवश्यक होते मात्र तसे न करता उलट त्यांना अभय दिल्याचे दिसत आहे.

     इंदापूर कडून येणाऱ्या वाहनांना अनेकदा बावडा गावातील रस्ता दुभाजक न दिसल्याने धडकून मोठे अपघात झाले आहेत. त्यामध्ये वाहनांचे व दुभाजकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच भांडगाव चौकातच विद्यालय सुटल्यानंतर मोठी गर्दी होवून सतत अपघात घडत असतात. नरसिंहपूर चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान परीसर असून येथेही सतत अपघात घडत असतात. पुढे छत्रपती शाहू महाराज चौक असून इंदापूर, वालचंदनगर व अकलूज कडून येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे.

    त्यामुळे बावडा गावातील इंदापूर अकलूज मार्गावरील छत्रपती शाहू महाराज चौक, नरसिंहपूर चौक, भांडगाव चौक व श्री शिवाजी विद्यालय चौकात गतीरोधक बसवण्यात यावेत, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस व परीवहन विभागाने संयुक्तीक बिगर नंबर प्लेट, ओव्हरलोड, नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने गतीरोधक बसवावेत, शाळा व चौकात सुरक्षेचे सुचना फलक लावावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

    निवेदनाच्या प्रती तहसीलदार इंदापूर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती, इंदापूर पोलिस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग इंदापूर आदिंना देण्यात आले आहेत.




फोटो - बावडा येथील इंदापूर अकलूज मार्गावरील गतीरोधक नसलेले धोकादायक रस्ता दुभाजक दिसत आहेत.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा