Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २० ऑगस्ट, २०२५

*राज्यस्तरीय कुराश स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याने पटकावली सर्वसाधारण चॅम्पियनशिप-- इंदापूरच्या खेळाडूंनी दाखविला आपला करिष्मा*

 


इंदापूर तालुका ---प्रतिनिधी*

 *डॉ.संदेश शहा*

 *मो:-9921 419 159

इंदापूर, डॉ. संदेश शहा.

कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत पुणे जिल्ह्याने आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखत प्रथम क्रमांकाची चॅम्पियनशिप मिळवली. कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये १९ जिल्ह्याने सहभाग नोंदविला होता. या स्पर्धा दिनांक १६ व १७ ऑगस्ट रोजी न्यू पॅलेस शेजारी पुनगावकर मळा श्री दत्त स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कोल्हापूर या हॉलमध्ये संपन्न झाल्या. 

या स्पर्धेचे उद्घाटन श्री शिवजयंती महोत्सव समिती पुणे चे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, मालोजीराजे छत्रपती 

करवीर संस्थानचे

युवराज यशराजे, कोल्हापूर महानगर पालिका स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, माजी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, राजाभाऊ घुले, धैर्यशील पुनगावकर, संघटनेचे अध्यक्ष अंकुश नागर, सचिव शिवाजी साळुंखे, सहसचिव दत्तात्रेय व्यवहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. सदर स्पर्धेमध्ये इंदापूर येथील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत आपल्या वजन गटामध्ये प्राविण्य प्राप्त केले सर्व विजयी खेळाडूंचे शहा हेल्थ क्लबचे विश्वस्त भरतशेठ शहा व मुकुंद शेठ शहा यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विजयी खेळाडू पुढील प्रमाणे आहेत.

 कु. आरफा काझी - २४ किलो द्वितीय क्रमांक.

जी २

 कु. काव्या शुक्ला. ३२ किलो - द्वितीय क्रमांक.

कु. श्रावणी सूर्यवंशी : २४ किलो - द्वितीय क्रमांक. कु. आरोही गायकवाड - २८ किलो : तृतीय क्रमांक.

कु. सई शिंदे - ३६ किलो - प्रथम क्रमांक. 

कु. अंकिता धोत्रे : ४४ किलो : प्रथम क्रमांक.

कु. श्रावणी देवकर : ४४ किलो : प्रथम क्रमांक. 

कु. दुर्वा वाघमोडे : ४४ किलो -द्वितीय क्रमांक.

 जी ३

कु. पलक काळे - ३६ किलो - प्रथम क्रमांक.

कु. अनुष्का भिसे : ३६ किलो -द्वितीय क्रमांक.

कु. शिवानी सूर्यवंशी : ४० किलो - प्रथम क्रमांक.

कु. सुकन्या जाधव : ४४ किलो - द्वितीय क्रमांक.

कु. आरोही झेडगे - ४४ किलो : तृतीय क्रमांक.

कु. यशिता शिंदे - ४८ किलो : प्रथम क्रमांक.

कु. वैशाली शिंदे : ६० किलो : तृतीय क्रमांक.

मुले

जी वन 

ओंकार शिंदे - ३० किलो : प्रथम क्रमांक.

कु. आदिराज गायकवाड. - द्वितीय क्रमांक.

कु. मयुरेश खुसपे : ३० किलो.  

कु. ज्योतिरादित्य गायकवाड : ३० किलो :

तृतीय क्रमांक.

जी २

कु. युद्धवीर गायकवाड - ५० किलो : द्वितीय क्रमांक.

कु. रणवीर गायकवाड : ५० किलो - प्रथम क्रमांक.

कु. वरद दिवसे : ५० किलो : द्वितीय क्रमांक. 

जी ३

कु.आदित्य शिंदे - ३५ किलो : प्रथम क्रमांक. 

कु. पुष्कर भोगुलकर : -४५ किलो : द्वितीय क्रमांक. 

कु. ओंकार शेलार : ५० किलो : प्रथम क्रमांक. 

कु. अनिकेत देवकर - ५० किलो : तृतीय क्रमांक.

कु.आर्यन मोकाशी : ५५ किलो :प्रथम क्रमांक.

कु. प्रज्वल घनवट : ६० किलो : द्वितीय क्रमांक.

कु.अथर्व मोरे : ६० किलो - तृतीय क्रमांक.

 रुद्र पिसे : ४५ किलो,

कु.आर्या पवार - ४४ किलो, कु. विवेक बघेल : २५ किलो, कु. आदर्श जंजीरे - ४५ किलो वजन गटात सहभाग घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा