Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५

जैन धर्मियांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थराज श्री सम्मेद शिखरजी मधुबन झारखंड येथे १००८ यात्रेकरु 12 सप्टेंबर रोजी रवाना, तेथील स्वच्छता अभियानाची गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार नोंद---अध्यक्ष मिहीर गांधी यांची माहिती


 

इंदापूर तालुका ---प्रतिनिधी

डॉ.संदेश शहा

मो:-9921 419 159

फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज, भारत वर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी तसेच श्री सन्मती सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यासह इतर ३ राज्यातील १००८ जैन श्रावक, श्राविका यांना जैन धर्मियांची काशी म्हणून ओळख असलेल्या श्री सम्मेद शिखरजी, मधुबन (झारखंड) येथे नेण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यानुसार दिनांक १२ सप्टेंबर रोजी १००८ जैन श्रावक, श्राविका श्री सम्मेद शिखरजी येथे रवाना झाले. यावेळी जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथ यांच्यासह इतर २३ तीर्थंकरांचा जयघोष करण्यात आला तसेच शाश्वत अनमोल नमोकार मंत्राच्या जयघोषात ही यात्रा सुरू झाली. दरवर्षी प्रमाणे या पवित्र तीर्थक्षेत्रावर स्वच्छता अभियान राबविले जाणार असून त्याची नोंद ' द गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड ' मध्ये होणार असल्याची माहिती भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व श्री सन्मती दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहीरभाई गांधी यांनी दिली. 

 मिहीर गांधी पुढे म्हणाले, मुंबई, सोलापूर सह विविध जिल्ह्यातील २४० जैन श्रावक श्राविका दौंड येथून १२ सप्टेंबर रोजी रवाना झाले. यात सोलापूर जिल्ह्यातील पापरी मोहोळ, पंढरपूर, अकलूज, नातेपुते करमाळा आदि तालुक्यातील जैन धर्मीय सहभागी झाले आहेत. सोलापूर, मुंबई सह पुणे, अहिल्यानगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, सातारा बीड जिल्ह्यातील जैन धर्मियांचे व तरुण तरुणींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्री सन्मती सेवा दलाकडून गत १३ वर्षांपासून श्री सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र उंच पहाडावर स्वच्छता अभियान राबविले जाते. यंदाचे हे १४ वे वर्ष आहे. फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने महाराष्ट्र सहित देशातील, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि दक्षिण भारत येथून १००८ जैन धर्मियांना श्री सम्मेद शिखरजी यात्रा घडवण्याचा संकल्प करण्यात आला होता. जैन धर्मियांची काशी म्हणून ओळख असलेल्या श्री सम्मेद शिखरजीस जाण्याचे प्रत्येक जैन धर्मियांचे स्वप्न असते, सर्वच बांधव आर्थिक दृष्ट्या सक्षम नसतात, किंवा सदर यात्रा करण्यासाठी सोबत घरातील सहकारी नसतो अशा व्यक्तींना सवलतीच्या दरात समूहाने शिखरजी दर्शन व त्यासोबत इतरही जैन धार्मिक स्थळांचे दर्शन घडवून आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्वच्छता अभियान १२ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत संपन्न होणार असून हा एक विक्रम आहे. तीर्थराज सम्मेद शिखरजी येथे यंदा महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश राज्यातील १००८ हून अधिक संख्येने जैन धर्मीय एकत्रित येणार असल्याने सदर स्वच्छता अभियानाची दखल 'द गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड' घेणार असल्याचे श्री. गांधी यांनी सांगितले.


आज दौंड कॉर्ड लाईन वरून यात्रेकरू रवाना झाले असून जैन समाजाचे नेते सुशील शहा, पूर्वा शहा, वर्धमान दोशी, प्रियांका दोशी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सदर अभियान यशस्वी होण्यासाठी हुमड जैन समाज तसेच सेवा दलाचे विद्यमान अध्यक्ष अभिजित दोभाडा, संदेश गांधी, विरकुमार दोशी, नमन गांधी, हुमड राष्ट्रीय अध्यक्ष विपीन गांधी, महामंत्री महेंद्र बंडी, माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, महिला पदाधिकारी सुजाता शहा, तनुजा शहा, संज्योत व्होरा यासह पदाधिकारी, आजी माजी अध्यक्ष, सदस्य संचालक परिश्रम घेत आहेत. महाराष्ट्र हुमड अध्यक्ष किरण शहा, मंत्री रविकिरण शहा तसेच अभियानामध्ये सहभागी संदीप शहा, केतन दोशी, महावीर शहा, सम्मेद शहा, सतीश व्होरा, प्रदीप झाडे, सागर भालेराव, रत्नकुमार फडे, काकासाहेब लोखंडे, आकाश गांधी, पियुष गांधी, पार्थ गांधी यांनी ही यात्रा यशस्वी करण्याचे योग्य नियोजन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा