Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५

शब्दांचे योद्धा म्हणून" चाँदभैय्या शेख" यांचे समाजासाठीचे कार्य प्रेरणादायक


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

पारे गावच्या मातीत कुसळसुद्धा उगवत नाहीत म्हणतात , पण याच मातीने अनेक हिरे विविध क्षेत्रात तयार केले आहेत. अशाच समाज माध्यमातील पत्रकारिता क्षेत्रातील एक हिरा ज्यांनी पारे गावाची ओळख संपूर्ण देशात करून दिली ते म्हणजे निर्भीड संपादक जेष्ठ पत्रकार, नवोदितांचे मार्गदर्शक, निर्भीड आणि ज्यांची लेखणी नेहमीच आमच्यासारख्यांना दिपस्तंभ ठरते लोकप्रिय पञकार चाँदभैय्या शेख ! त्यांचा आज वाढदिवस ... महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एक  तरुण, अभ्यासू पत्रकार समाजातल्या सर्व घटकांचे प्रश्न निर्भीडपणे, प्रामाणिकपणे, पोट तिडकेने मांडून प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करून, समाजाची सेवा करतो हे पत्रकार चाँदभैय्या शेख यांनी त्यांच्या कर्तुत्वातून सिद्ध केलेले आहे.पत्रकार हा समाजाचा आरसा, समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांचं फार मोठ योगदान आहे.अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, समाजातील उपद्रवमुल्ये याबाबत पत्रकारितेच्या माध्यमातून निर्भीडपणे आवाज उठवून काही पत्रकार मा. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या आदर्श पत्रकारितेला न्याय देत असतात. एखादी बातमी प्रसिद्ध करताना त्याची सत्यासत्यता आणि दुसरी बाजू समजून घेणे आवश्यक असते.खोट्या माहितीवर प्रसारित केलेल्या बातमीमुळे त्या पत्रकाराबरोबर त्या पेपरच्याही विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत.अनेकदा उथळ पत्रकारितेमुळे सामाजिक प्रश्नही निर्माण होतात… मात्र पत्रकारितेच्या या बदलत्या स्वरूपातही काही पत्रकार हे पत्रकारितेचं आणि लोकशाहीच्या या चौथ्या खांबाचं पावित्र्य जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत थोडक्यात......लहानपणापासून समाजाची सेवा करण्याची आवड व आपल्या धारदार लेखनीने व पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य, तळागाळातील गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे व गेल्या आठरा वर्षापासून पत्रकारिता, सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे सीबीएस न्युज मराठी नेटवर्क चे संपादक व निर्भीड पत्रकार चाँदभैया शेख यांना विविध क्षेञातील आतापर्यंत एकशे एक राज्यस्तरीय पुरस्कार आणि दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले असून जवळपास कोरोनाच्या काळात सुमारे दोन शे वेळा कोविड योध्या म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.कवी जसा जन्मावा लागतो. तसा पत्रकार आकाराला यावा लागतो. कवी आपल्या कवितेत कल्पनेने रंग भरतो. पण पत्रकाराला तसं बातमीमध्ये कल्पनेचं झालर लावता येत नाही. पत्रकाराला स्वतः बातमीत उतरावं लागतं. पत्रकार हा धक्का धक्कीचे साहित्य निर्माण करणारा वास्तववादी साहित्यिकच असतो. निःपक्ष व निर्भीडपणे सत्य मांडण्यासाठी समाजावर, गोरगरिबांवर, स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी वृत्तपत्राची आवश्यकता असते. याची जाणीव चाँदभैय्या शेख यांना झाली. चाँदभैय्या शेख यांनी अनेक संघटनामध्ये स्वःताला झोकून देऊन काम केले आहे. प्रत्येक संघटनेत आपल्या कार्याचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे. राजकीय क्षेत्रात हि त्यांनी चार वर्षे सांगोला तालुका अल्पसंख्याक काँग्रेस तालूका अध्यक्ष म्हणून काम करताना सर्वसामान्य गोरगरीबांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. निर्भीड विचारधारा असल्याने त्यांचे सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी दिसून आली.आहे. अन्याया विरोधात वाचा फोडण्याचे काम ते नेहमी करत असतात. त्यांची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी आहे. तसेच लेखन ज्ञान, ध्येयवाद, अभ्यासू, सत्यनिष्ठ, निर्भीडता, जिज्ञासावृत्ती, मनमिळाऊ स्वभाव, चारित्र्य संपन्न व प्रेरणादायी असे गुणवैशिष्ट्ये त्यांच्या अंगी दिसून येतात. सांगोला सारख्या उजाड माळरान भागात ज्या काही घटना घडामोडी घडतात त्या दिवस भराच्या घडामोडी संकलन करून प्रकाशित करतात.एवढ्या वरच गप्प न बसता, पोलिस स्टेशन, पंचायत समिती, तहसील कार्यालय, कृषी कार्यालय यासह इतर प्रशासकीय कार्यालयात, जनतेच्या आलेल्या तक्रारी संदर्भात, अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून बोलून तक्रारीचे, अडचणीचे निवारण करतात. सत्य शोधण्यासाठी बातमीचा पाठलाग करणारा पत्रकार म्हणून चाँदभैय्या यांची ख्याती आहे. अन्यायाविरुद्ध झुंज देणारा झुंजार पत्रकार असे त्यांना संबोधण्यात येत.भैय्या हे चळवळीतील कार्यकर्ते, निर्भीड, पत्रकार मनमिळाऊ स्वभावचे असल्याने त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. तसेच कामगार कर्मचान्यांना न्याय देण्यासाठी त्यांना एकजूट करून सतत काम करीत आले आहेत. विशेषतः राज्यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, क्रीडा विषयांचे बातमीपत्र गाजले आहेत. अलीकडेचं वाङ्मयातील नामांकित समाजसेवक म्हणून देखील मोठा नावलौकिक मिळवला आहे. यातच त्यांची - लोकप्रियतेचे गमक आहे. मात्र हे यश ही लोकप्रियता, हा मानसन्मान त्यांनी मोठ्या कष्टातुन व जिद्दीतुन मिळवला आहे. ते देखील तितके चं खरे..... त्यामुळेचं गावागावातील लोक व विषेश तरूणाई त्यांची फँन झालेली आहे. आपल्या लिखाणाने लोक अस्वस्थ करणारे चाँदभैय्या यांच्यासारखे पत्रकार फार अपवादानेचं आढळतात त्यामुळेचं त्यांनी आपले वेगळेपण महाराष्ट्रात कितेक वर्षे कायमचं जपले आहे.पत्रकारिता ही एक अशी प्रणाली आहे की यात काम करणाऱ्या माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानार्जन व ज्ञानदान संपत नाही,खरेतर चाँदभैय्या यांच्या पत्रकारितेने सांगोला तालुका अनेक वर्ष गाजला आणि गाजतो ही आहे, अतिशय संवेदना जपणारा हा माणूस आहे .प्रचंड अभ्यास, शांत वृत्ती,नव्या विषयाचा अभ्यासुपणा, शिक्षण,शेती , सहकार,सामाजिक बांधिलकी, प्रशासन , राजकारण इतकेच नव्हे तर सांगोल्याच्या ऐतिहासिक घटने पासून ते सांगोला मातीतले काय गुणधर्म इथपर्यंत ते सांगोलाच्या हजारो वर्षांचा इतिहास काय सांगतो ? याचं चालतं बोलतं विद्यापीठ त्यांच्यात ठासून भरलेले आहे !


*सौ. एस. एच. भोसले*

(सीबीएस न्युज चीफ एडिटर)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा