उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळीनगर येथील महात्मा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडून सभासदांना १५ टक्के लाभांश दिला जाणार असून सभासदांच्या मुलामुलींकरता परदेशी शिक्षणाला जाण्यासाठी संस्थेकडून एक लाख रुपयांची मदत देणार असल्याचे पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गिरमे यांनी जाहीर केले. उच्च
पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा राजेंद्र गिरमे यांच्या अध्यक्षतेखाली माळीनगर येथील सौभाग्य मंगल कार्यालयात झाली. ते पुढे सांगितले की, पतसंस्था नेहमीच गरजूंच्या मदतीकरता दवाखाना, शिक्षण, शालेय साहित्य यासाठी मदतीचा हात पुढे करत असते. त्यासाठी दरवर्षी १० ते १२ लाखाची मदत केली जाते.
यावेळी सचिव योगेश कचरे यांनी अहवाल वाचन करून २०२४-२५ या सालामध्ये संस्थेस ८२ लाख २१ हजार ४७८ रुपयांचा नफा झाला. वार्षिक उलाढाल २१७ कोटी रुपयेची असून ऑडिट वर्ग 'अ' कायम राहिला आहे. ५२० सभासद असलेल्या या संस्थेचे वसूल भागभांडवल १ कोटी ११ लाख २० हजार तर राखीव व इतर निधी १४ कोटी ९२ लाख ८
महात्मा फुले पतसंस्था, मालीनगर ३२ वी वार्षिक सर्व साधारण सभा आपले सहर्ष स्वागत करीत आहे
हजार १६२ रुपये आहे. तसेच २२ कोटी ८९ लाख ५८ हजार ४३० रुपयांच्या ठेवी आहेत.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष महादेव एकतपुरे, संचालक किरण गिरमे, अंकुश फुले, चंद्रकांत जगताप, अमोल गिरमे, जयवंत चौरे, सूरज वाघमोडे, कृष्णा भजनावळे, प्रभा काळे, किशोरी चवरे, तज्ज्ञ संचालक जनक ताम्हाणे, अमित टिळेकर उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा