Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५

इंदापूर येथे प्रदिप दादा मित्र परिवारा कडून मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त मिठाई वाटप---हिदु, मुस्लिम ऐक्याचा सर्वांनी.आदर्श घ्यावा --प्रदीप गारटकर


 

इंदापूर तालुका ---प्रतिनिधी

डॉ.संदेश शहा

मो:-9921 419 159

मुस्लिम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर शहरात काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर मित्र परिवाराच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईद-ए- मिलादून्नबी निमित्त शुभेच्छा देत हजारी मिठाई बॉक्सचे वाटप करण्यात आले. शिवाजी चौक खडकपूरा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर चौकात मिठाई वाटप करण्यात आले.

यावेळी प्रदीप गारटकर म्हणाले, इंदापूर शहरात हिंदू मुस्लिम समाजा मध्ये जातीय एकोपा कायम असून हिंदू मुस्लिम एकमेकांच्या सणात भाग घेऊन सण आणि उत्सव आनंदाने साजरा करत. हिंदू, मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचा आदर्श सर्वांनी घेऊन राष्ट्रीय एकात्मता संवर्धित व्हावी यासाठी गोड मिठाईचे वाटप करण्यात येत आहे.  

यावेळी रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे जिल्हा प्रतिनिधी, माजी अध्यक्ष वसंतराव मालूंजकर, माजी नगरसेवक अतुल शेटे पाटील, अनिल राऊत, अमर गाडे, श्रीधर बाब्रस, दिलीप वाघमारे, अनिकेत वाघ, इंदापूर शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष इम्रान शेख, इंदापूर शहर राष्ट्रवादी अल्पसंख्याक अध्यक्ष अहेमदरजा सय्यद, वसीम बागवान, श्रीनिवास घोलप, आशुतोष गानबोटे, आनंद मखरे, राकेश गानबोटे, शुभम मखरे, मुनीर बागवान, अमर लेडवे, बन्सी भंडलकर, पांडुरंग जाधव, आझाद पठाण, रुपेश सोनी यांच्यासह प्रदीप गारटकर मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इंदापूर शहरातील मुस्लिम बांधवांनी हजरत महंमद पैगंबर काढलेल्या जुलूसला शुभेच्छा देत, इंदापूर शहरातील खडकपुरा येथे प्रदीपदादा गारटकर मित्र परिवाराच्या वतीने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत, हजारो मुस्लिम बांधवांना मिठाईच्या बॉक्सचे वाटप करण्यात आले. केवळ मुस्लिम बांधवच नव्हे तर, इतरही 

बांधवांसाठी देखील प्रदीपदादा मित्र परिवाराच्या वतीने वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.इंदापूरचे सांस्कृतिक, सामाजिक वैभव वाढविले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा