इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
[9/4, 5:20 PM] Abba 🌍❣️: एकात्म मानव दर्शन या पुणे जिल्हास्तरीय समितीच्या अशासकीय सदस्यपदी इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी उत्तम फाळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पंडित दीनदयाळ हिरक महोत्सवानिमित्त एकात्म मानव दर्शन समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी समितीचे अध्यक्ष आहेत. पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह शासनाच्या १६ शासकीय खात्याचे प्रमुख या समितीचे सदस्य आहेत.
उत्तम फाळके हे इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक गावचे रहिवासी आहेत.
निवडीनंतर उत्तम फाळके म्हणाले,पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचा एकात्म मानव दर्शनाचा विचार युवा पिढी, विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, महिला, कामगार, सनदी लेखापाल, अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, राज्यातील युवापिढीचा सर्वांगीण विकास करणे हे उपक्रम जिल्हास्तरीय समिती मार्फत राबवण्यात येणार आहेत. समितीच्या माध्यमातून एक लाख पुस्तके छापून जिल्ह्यात वाटप करण्यात येणार आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या समवेत समितीची एक बैठक नुकतीच पुण्यात पार पडली असून दर महिन्याला समितीची बैठक होणार असल्याचे
फाळके यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा