Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

विविध शालेय क्रीडा स्पर्धेत स.मा.वीचे घवघवीत यश.... शाब्बास मुलांनो असेच यश संपादन करा - मुख्याध्यापक अमोल फुले


 

प्रतिनिधी -शकूर तांबोळी, अकलूज.

अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात विविध शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये आलेल्या गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. त्यानिमित्ताने विद्यालयाचे *मुख्याध्यापक अमोल फुले* यांनी आपल्या मनोगतात महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागातर्फे राज्यभर शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धा तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर घेतल्या जातात. महाराष्ट्र शासनाचा क्रीडा व युवक सेवा संचालनालय या स्पर्धांचे आयोजन दरवर्षी करते. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे ज्याने क्रीडा धोरण जाहीर केले. खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि खेळांच्या विकासासाठी धोरणात्मक दृष्टिकोन ठेवणे हा याचा उद्देश आहे. याचबरोबर क्रीडा क्षेत्राचे जीवनातील महत्त्व काय आहे हेही सांगितले अशी माहिती दिली. 


सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत १४ वर्षं वयोगटात विद्यालयातील विनय रणसुभे क्रमांक पटकावून त्याची पुणे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली तर १९ वर्ष वयोगटात मुलींमध्ये सारिका बावळे जिल्हास्तर तृतीय पुणे विभागासाठी निवड.


शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालय माळेवाडी येथे पार पडल्या त्यामध्ये विद्यालयातील प्रथमेश वायदंडे - 200 मीटर धावणे प्रथम, 400 मीटर धावणे प्रथम, 400 मीटर अडथळा प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरावर निवड.

संग्राम लवटे - गोळा फेक प्रथम जिल्हास्तर निवड 

शिवप्रसाद वाटकर - ५ किलोमीटर चालणे प्रथम जिल्हास्तर निवड 

शिवम चव्हाण - क्रॉस कंट्री तृतीय क्रमांक जिल्हास्तर निवड 

शंभू अदलिंगे - ६०० मीटर धावणे द्वितीय जिल्हास्तर निवडी

आसावरी वाघ व सार्थक जमदाडे - लांब उडी द्वितीय क्रमांक जिल्हास्तर निवड

सिद्धार्थ धाईंजे - ३००० मिटर धावणे तृतीय क्रमांक

संजय शिंदे - हातोडा फेक तृतीय क्रमांक.... सदर विद्यार्थ्यांनी शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केल्यामुळे विद्यालयाचे मुख्यध्यापक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य सुभाष मुंडफने, संजय जाधव तसेच यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक संजय राऊत, उमेश भिंगे, दुधाळ सर त्यांचाही सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा