विशेष प्रतिनिधी-- एहसान मुलाणी
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9096837451
सर्व जगाला अमन शांती एकता बंधुता समतेचे संदेश देणारे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची 1500 वी जयंती( ईद मिलादुन्नबी) अकलूज येथे मोठ्या उत्साहाने व भक्ती भावाने साजरी करण्यात आली
या जयंतीनिमित्त अकलुज येथील काझीमोहल्ला येथून ईद मिलादुन्नबी जुलूस ला(मिरवणुकीस) प्रारंभ झाला ही मिरवणूक काझी गल्ली ,नगरपरिषद कार्यालय, जुने ग्रामपंचायत, हनुमान मंदिर, बागवान गल्ली ,आंबेडकर चौक, जुने एसटी स्टँड ,उपजिल्हा रुग्णालय, जुने पोलीस स्टेशन ,विजय चौक येथून परत त्याच मार्गाने बागवान गल्ली येथील कौलारू शाळेत येऊन त्याची सांगता झाली यानंतर नातखानी व
प्रेषितांच्या जीवनावर प्रवचन संपन्न झाले
या मिरवणुकीत "नारे तकबीर अल्लाहू अकबर -नारे रिसालत या रसुलुल्लाह -सरकार की आमद मरहबा -बच्चा बच्चा कहता है नबी हमारा सच्चा है-इत्यादी घोषणाने प्रेषितांचा जयजयकार करत होते
याप्रसंगी बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की हजरत मोहम्मद पैगंबर यांनी सर्व जगाला अमन शांती समता बंधुता एकतेचा संदेश दिला त्याचे अनुकरण करणे काळाची गरज असून मला माढा लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजाने मतदानाच्या रूपाने भरभरून प्रेम दिले त्यामुळे मी त्यांचा ऋणी आहे
याप्रसंगी जामा मस्जिद बागवान गल्ली चे इमान यांनी प्रेषितांच्या जीवनावर प्रवचन केले
याप्रसंगी अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच किशोर सिंह माने पाटील, सोलापूर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष -फत्तेसिंह माने पाटील माजी उपसरपंच -धनंजय भाऊ देशमुख, शिक्षण प्रसारक मंडळाचे सभापती- सयाजीराजे मोहिते पाटील ,अभिजीत माने पाटील ,अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक- नीरज उबाळे ,पोलीस उपनिरीक्षक- साळुंखे, एडवोकेट वजीर शेख, किरण तात्या धाईंजे, अजित मोरे, प्रवीण साळवे, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत नाना कुंभार, भारत तात्या मगर ,शशिकांत कडबाने, कृष्णा लावंड ,नागेश लोंढे, उपस्थित होते
या पैगंबर जयंती मिरवणूक मध्ये बागवान मस्जिद, दर्गाह मस्जिद, मदिना मस्जिद -काजी गल्ली, शाही मस्जिद कब्रस्तान, कुरेशी मस्जिद, अल् फत्हा मस्जिद, संग्राम नगर महादेव नगर, येथील मदरसा, प्रतापसिंह चौक मस्जिद, शाही मस्जिद मुल्ला गल्ली, इत्यादीं ठिकाण चे इमाम व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
या मिरवणुकी प्रसंगी जागोजागी मुस्लिम बांधवांना सरबत मिठाई फळे बिस्किट पाणी बॉटल इत्यादीचे वाटप करण्यात आले
याप्रसंगी पैगंबर जयंतीनिमित्त उपस्थित असलेल्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांसाठी बागवानी गुलशन भगवान जमातच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये स्त्री पुरुष आभार राजधानी या महाप्रसादाचा लाभ घेतला
ही पैगंबर जयंतची मिरवणूक शांततेने आणि भक्ती भावाने पार पडली याप्रसंगी अकलूज पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्यांचेही मुस्लिम समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा