संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
कुर्डू तालुका माढा येथे बेकायदेशीर आवेद्यरित्या , मुरूम उपसा होत असलेली खबर लागल्यानंतर आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा या त्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी गेले असता तेथील काही गावगुंडाने वेडा टाकला आणि राज्याची उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना फोन लावून दिला अजित दादा चे फोनवरील शब्द त्याच गुंडांनी रेकॉर्ड केला स्पीकर ऑन करून अधिकाऱ्याला बोलायला लावला आणि आणि तो कॉल वायरल केला जनमानसात एका आयपीएस अधिकाऱ्याची प्रतिमा मलिन झाली त्यांच्यासमोरच तहसीलदार च्या अंगावर जाण्याचा प्रकार झाला प्रांतअधिकारी उपस्थित असताना तलाठ्याला मारहाण झाली . या प्रश्नावर जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल खूपसे यांनी आवाज उठवला यावेळी आरोप प्रत्यारोप झाले आणि अखेर त्या गुंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला परंतु अजितदादा पवार यांनी माफी मागावी या प्रश्नावर जनशक्ती संघटना ठाम असून अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खचू नये म्हणून जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने करमाळ्याच्या कमला भवानी मंदिरात अभिषेक करून आरती करण्यात आली आणि त्यानंतर जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने आयपीएस अंजली कृष्णा यांच्या फोटोला दुग्धभिषेक घालण्यात आला यावेळी बोलताना अतुल खूपसे पाटील म्हणाले अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करण्यासाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी कॉल केला यामुळे अधिकाऱ्यात भीतीच वातावरण निर्माण झाले आहे अंजना कृष्णा या केरळ राज्यातील आहेत आपल्यातील मुलगी केरळमध्ये जाऊन नोकरी करत असेल सेवा करत असेल आणि तेथील
उपमुख्यमंत्री तिला दमबाजी करत असेल तर आपल्याला किती वाईट वाटेल म्हणून अजित दादांनी या लाडक्या बहिणीची माफी मागावी आणि त्यांचे मनोधैर्य खचू नये म्हणून जनशक्ती संघटनेच्या वतीने तुळजाभवानी मातेच्या मंदिरात पूजा घालून ज्या आयपीएस अधिकाऱ्याच्या नावातच अंजन आहे म्हणजे मारुतीरायाच्या आईचं नाव आहे आणि जिच्या आडनावात कृष्ण आहे अशी अधिकारी वाईट कशी असू शकते आसा भावनिक प्रश्न खुपसे पाटील यांनी केला पुढे बोलताना आज आम्ही त्या अधिकाऱ्याला सपोर्ट करण्यासाठी दुग्ध भिषेक घातला आहे यावेळी गणेश भानवसे बालाजी तरंगे शरद या कार्ड किशोर शिंदे काका दरगुडे वैभव मस्के निलेश पवार साहेबराव विटकर हनुमंत कानतोडे सागर महाराज असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा