विशेष प्रतिनिधी-- एहसान मुलाणी
टाइम्स 45 न्यूज मराठी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर जळकोट येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी सर्व शिक्षकांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती तथा थोर तत्वज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेतील मुख्याध्यापिका महामुनी मॅडम तसेच सहशिक्षक रेणुके मॅडम, इटकरी सर, अभिवंत सर, चव्हाण सर, कुडकले सर व युवा प्रशिक्षणार्थी श्रीकांत कदम सर या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
तसेच शिक्षक दिनानिमित्त जळकोट नगरीतील सामाजिक कार्यकर्ते तथा शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शकीलभाई मुलाणी व मुलाणी परिवाराच्या वतीने शाळेतील सर्व शिक्षकांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार हे होते तर प्रमुख उपस्थिती उपाध्यक्ष शकील मुलाणी व पत्रकार मंगेश सुरवसे होते. या प्रसंगी चव्हाण सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी अनमोल रोमन, श्रद्धा पांचाळ व प्रीती भोगे यांनी केले तर आभार धनराज कुडकले यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा