उपसंपादक नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
महाराष्ट्रामध्ये नामांकित असणाऱ्या प्रा.रसूल साेलापुरे पुरस्काराने लेखक इंद्रजीत पाटील सन्मानित झाले. हा राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रसूल साेलापुरे बहुउद्देशीय संस्था,महागाव,ता.गडहिंग्लज,जि.काेल्हापूर या संस्थेने त्यांना जाहीर केला होता.त्यांच्या शेलक्या बारा या कथासंग्रहास मिळालेला हा अकरावा पुरस्कार असून यावर्षीचा हा तेविसावा राज्यस्तरीय पुरस्कार आहे.आत्तापर्यंत त्यांना साहित्यसेवा करताना एकूण चाळीस राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,राेख रक्कम,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ असे सदर पुरस्काराचे स्वरूप हाेते.हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष प्रा.रसूल साेलापुरे,उपाध्यक्षा परविन साेलापुरे,सचिव अझहर साेलापुरे यांनी त्यांना सन्मानपूर्वक प्रदान केला.लेखक इंद्रजीत पाटील यांनी हा पुरस्कार त्यांचे वडील कै.कल्याण जनार्दन पाटील यांना समर्पित केला.साेलापूर जिल्ह्यातील या ग्रामीण लेखकाने आपल्या दर्जेदार लिखाणाच्या जाेरावर साहित्यक्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटविला आहे.त्याबद्दल त्यांचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.मा.माधवरावजी कुतवळ,जनसेवक अमाेल माधवरावजी कुतवळ,पंडितराव लाेहाेकरे,भागवत उकिरंडे,चंद्रकांत पाटील,रावसाहेब पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,जीवराज गरड यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा