Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय गीत लेखन स्पर्धेत इंदापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक कवयित्री श्रीमती प्रतिभा गारटकर प्रथम पुरस्कार


 

इंदापूर तालुका ---प्रतिनिधी

डॉ.संदेश शहा

मो:-9921 419 159

कल्याण मुंबई येथील काव्य विलास मंच यांच्या वतीने आपल्या देशाचे जगप्रसिद्ध लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपन्न झालेल्या राज्यस्तरीय गीत लेखन स्पर्धेत इंदापूर येथील जेष्ठ साहित्यिक कवयित्री श्रीमती प्रतिभा गारटकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना नमो गीत लेखन साठी प्रथम परीक्षक मंडळ प्रमुख प्रभाकर संत, संयोजक परीक्षक विलास शिंदे, प्रायोजक परीक्षक श्रीकांत फाटक, परीक्षक सहसंयोजक यशवंत अत्रे, सल्लागार परीक्षक किरण जोगळेकर यांनी श्रीमती गारटकर यांना पत्राव्दारे प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र पाठवून त्यांचा सन्मान केला आहे.  

श्रीमती गारटकर या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या मातोश्री असून त्यांचे साहित्य, काव्य, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, दिव्यांग क्षेत्रात अनमोल योगदान आहे. ज्येष्ठ कवियत्री प्रतिभा गारटकर मॅडम यांची प्रथम क्रमांक सन्मान मिळालेली कविता पुढीलप्रमाणे आहे.  

तुम्हाला आमुचे लाख प्रणाम !.......

तुम्हाला आमुचे लाखो प्रणाम! 

राष्ट्रोध्दारक राष्ट्र पुरुष तुम्ही 

सार्थ नरेंद्रचि नाम 

तुम्हाला आमुचे लाख प्रणाम!...

                      तत्त्वज्ञानी महान योगी विश्व वंद्य तुम्ही 

भाग्य आमुचे भारतीयांचे पंतप्रधान तुम्ही 

न्याय नीतीचे राम राज्य हे, शब्दातीत अनाम

तुम्हाला आमुचे लाख प्रणाम..१..

जनी जनार्दन हृदयी नारायण जनसेवा प्रीती 

अढळ एकचि ध्रुव तारा तो‌ ध्येय राष्ट्रभक्ती 

ध्येयपूर्तीस्तव प्रखर झुंज ही आदर्श एकचि नाम 

तुम्हाला आमुचे लाख प्रणाम..२..

पूर वादळे डगमग नौका तीरावरी आणिली

महारथी सारथी हारती यशस्वीता आली

स्थैर्य शांतीसह शक्ती युक्ती सुयश महा सत्काम

तुम्हाला आमुचे लाख प्रणाम..३..

विचार उक्ती कृती एक ती ‌निस्वार्थी वृत्ती 

कष्ट जिद्द अन् यशस्वीता ती सुदैवी संपत्ती 

यत्न देव श्रम श्रद्धा आपुली महान गुरु तो काम 

तुम्हाला आमुचे लाख प्रणाम..४..

महान तुमची ध्येयासक्ती महान अन् आशा 

कीर्ती शिखरावरी नेऊया महान या देशा 

वर्धमान नित विजीगिषा ही पळ नाही विश्राम 

तुम्हाला आमुचे लाख प्रणाम..५..

दूरदृष्टी ती पारख तुम्हा‌ माणूस जाणावा 

सहकार्याने एक जुटीने कार्यभाग व्हावा 

महान भारत महान सत्ता, दाता तो श्रीराम 

 तुम्हाला आमुचे लाख प्रणाम..६..

प्रतिभा गारटकर, इंदापूर, जिल्हा पुणे. 

    *****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा