इकबाल बाबासाहेब मुल्ला-- पत्रकार सांगली
मो:-8983 587 160
डॉक्टर हे देवमाणूस असतात परंतु ऍन्जोप्लास्टी झाल्यानंतर रुग्ण दगावत* असेल तर डॉक्टरांच्या आणि हॉस्पिटलच्या "विश्वासार्हतेवर" प्रश्नचिन्ह उमटू शकते.
मुनीर अ.करीम अमिन (मुन्नाभाई ) यांचा मृत्यू वेदनादायी आणि मनाला "चटका" देणारा !
सांगलीतील माझे "हितचिंतक" असणाऱ्या मुनीर अमिन (मुन्नाभाई ) या अत्यंत निरोगी असणाऱ्या आणि चालत - चालत दवाखान्यात जाणाऱ्या पेशन्टचा एन्जोप्लास्टी नंतर दुसऱ्या दिवशी झालेला धक्कादायकरित्या मृत्यू अनेक "प्रश्नांची मालिका" उत्पन्न करणारा आणि चर्चेचा विषय ठरला आहे.
विशेष म्हणजे एकाच आठवड्यात मुन्नाभाई अमिन,चाऊस चाचा (पानवाले) आणि आणखी एका व्यक्तीचा एन्जोप्लास्टी नंतर अचानकपणे मृत्यू झाला असल्याचे कळते.
वास्तविक हृदयविकार (हार्टअटॅक ) येऊ नये म्हणून, ब्लॉकेज काढण्याचे, "रक्ताची गुठळी" नष्ट करण्याचे कामं एन्जोप्लास्टी करत असेल तर रुग्ण कसा दगावू शकतो ?? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. एकंदर "एन्जोप्लास्टी" नंतर होणारे मृत्यू संशयास्पद आणि हृदयाचे ठोके चुकवणारे ठरले आहेत हें मात्र नक्की !
( मुन्नाभाई ज्या पेट्रोल पंप मध्ये कामं करत होते तेथील एका "कर्मचाऱ्याच्या वडिलांचा" अशाच प्रकारे एन्जोप्लास्टी नंतर अशाच पद्धतीने मृत्यू झाला आहे,हे विशेष ! महत्वाचे म्हणजे डॉक्टर आणि हॉस्पिटल. एकच ! ) असो,
एन्जोप्लास्टी चे तीन प्रकार असतात त्यामध्ये सध्या सर्वाधिक मागणी असणारे बलून एन्जोप्लास्टी , लेसर एन्जोप्लास्टी आणि एथेरॉकमवाटी असे प्रकार आहेत. रक्तवाहिन्यांमध्ये जे "स्टेंट" वापरले जाते त्यामध्ये किंवा या एन्जोप्लास्टी करण्याच्या 3 पद्धतीमध्ये काही बदल केला जातं आहे का ?? या प्रयोगामुळेच पेशन्ट "दगावत" आहेत का ?? असा "प्रश्न" देखील नागरिक उपस्थित करत आहेत.
नातेवाईकांना शंका असेल आणि प्रतिथयश - सुप्रसिद्ध डॉक्टरांकडूनच आपल्या पेशंटची शस्त्रक्रिया झाली आहे का ?? का शिकाऊ डॉक्टरमार्फत आपल्या पेशन्टचे ऑपरेशन झाले आहे ??? याची खातरजमा करण्याचा अधिकार रुग्णांना असायला हवा. त्यासाठी एन्जोप्लास्टी अथवा ओपनहार्ट सर्जरी सारखे ऑपरेशन "CCTV" च्या अखत्यारीत झाले तर रुग्णांना - नातेवाईकांना "आत्मीय समाधान" मिळेल. आणि दुर्दैवाने पेशन्ट दगावला तर अधिकृत - सुप्रसिद्ध डॉक्टरकडूनच पेशन्टचे ऑपरेशन झाले आहे यावर शिक्कामोर्तब होऊ शकेल.
त्याशिवाय एन्जोप्लास्टी नंतर "अचानकपणे" रुग्णाचा मृत्यू झाला असेल तर इतर अन्य कारणे असू शकतात. त्यापैकी एन्जोप्लास्टी झाल्यानंतर किडनी (मूत्रपिंड ) निकामी होणे, पेशन्टला पक्षाघात होणे, हृदयविकाराचा झटका येणे अशा प्रकाराने रुग्ण दगावू शकतो. तात्पर्य ,
रुग्णाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला आहे याची माहिती ( व्हिसेरा - पोस्टमार्टम ) द्वारेही "निश्चित माहिती" नातेवाईकांना मिळू शकेल ,आणि पेशण्टच्या मृत्यूचे खापर डॉक्टर आणि हॉस्पिटल वर फोडले जाणार नाही. आणि त्याद्वारे हॉस्पिटलची विश्वासार्हता अबाधित राहील.
डॉक्टर एकच.. परंतु एकाचवेळी 4-4 हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया ???
काही सुप्रसिद्ध डॉक्टर एकाच वेळी 4 -4 हॉस्पिटलमध्ये एन्जोप्लास्टी तसेच अन्य शस्त्रीक्रिया कशा करतात हें सर्वसामान्य जनतेसाठी "कोडेच" आहे. कारण सर्व ठिकाणी एकच डॉक्टर एकाग्रतेने समाधानाने - शांतपणाने - लक्ष्य केंद्रित करून ऑपरेशन करू शकतात का ?? का त्यांच्या स्टाफ मधील एखाद्या अप्रशिक्षितीत डॉक्टर कडून ऑपरेशन केले जाऊ शकते का ?? त्यामुळे रुग्ण दगावतो आहे का ?? हा सर्वसामान्य जनतेला पडलेला "गहन प्रश्न" आहे. कित्येक वेळा चालत - चालत जाणारा रुग्ण दुसऱ्या दिवशी मृत होतो याचे गोंडगबाल काय .???
मृत नातेवाईकांचा आक्रोश आणि "शंकेची पाल" चुकचुकत असेल तर यथार्थाने CCTV रेकॉर्डिंग फुटेजच्या माध्यमातून आणि व्हिसेरा आणि पोस्टमार्टम रिपोर्टच्या माध्यमातून सर्वच गैरसमज दूर होत असेल तर जनतेमध्ये कोणतीही सांशकता राहणार नाही.आणि हॉस्पिटल बद्दल असणारा विश्वास आणखीन दृढ होईल याबद्दल शंका नाही.
. *इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,
सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा